Lokmat Money > बिझनेस न्यूज > कोरोनामुळे अद्यापही कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार; ‘ही’ कंपनी २२०० जणांना काढणार

कोरोनामुळे अद्यापही कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार; ‘ही’ कंपनी २२०० जणांना काढणार

कोरोना विषाणूच्या महामारीनंतर २०२१ मध्ये बाजारपेठेतील चांगल्या तयारीसाठी पुनर्रचना योजनेचा एक भाग म्हणून २२०० नोकऱ्यांमध्ये कपात केली जाईल,

By प्रविण मरगळे | Published: December 19, 2020 12:31 PM2020-12-19T12:31:58+5:302020-12-19T12:32:48+5:30

कोरोना विषाणूच्या महामारीनंतर २०२१ मध्ये बाजारपेठेतील चांगल्या तयारीसाठी पुनर्रचना योजनेचा एक भाग म्हणून २२०० नोकऱ्यांमध्ये कपात केली जाईल,

Coronavirus Pandemic Affect Coca Cola To Layoff 2200 Employees As Profit Is Reduced | कोरोनामुळे अद्यापही कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार; ‘ही’ कंपनी २२०० जणांना काढणार

कोरोनामुळे अद्यापही कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार; ‘ही’ कंपनी २२०० जणांना काढणार

कोरोना व्हायरस महामारीचा परिणाम संपूर्ण जगावर झाला आहे. जागतिक पातळीवर अनेक व्यवहार ठप्प झाले, त्यामुळे मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागलं, ज्याच्यामुळे मोठ्या संख्येने लोकांच्या नोकर्‍या संकटात आल्या आहेत. जगातील सर्वात मोठी पेय कंपन्यांपैकी एक असलेल्या कोका-कोलानेही यादरम्यान मोठी घोषणा केली आहे. कंपनी नोकर्‍या कपात करणार आहे असं सांगितले गेले आहे.

२.६% कर्मचार्‍यांवर परिणाम

कोका-कोलाने सांगितले की, कोरोना विषाणूच्या महामारीनंतर २०२१ मध्ये बाजारपेठेतील चांगल्या तयारीसाठी पुनर्रचना योजनेचा एक भाग म्हणून २२०० नोकऱ्यांमध्ये कपात केली जाईल, वास्तविक कोरोनामुळे यावर्षी विक्रीवर परिणाम झाला आहे. या संदर्भात कंपनीच्या प्रवक्ते म्हणाले की, या महामारीमुळे त्याचा परिणाम कंपनीच्या जागतिक वर्कफोर्सच्या २.६ टक्के होईल आणि केवळ अमेरिकेतच १,२०० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत.

कोका-कोलाने दिला वॉलंटरी सेपरेशनचा कार्यक्रम

माहितीनुसार, कोका-कोलाने एक वॉलंटरी सेपरेशन कार्यक्रम तयार केला आहे, परंतु काही टप्प्यावर 'इनवॉलंटरी' काम करणार्‍यांना कमी करण्याची देखील आवश्यकता असेल. त्यामुळे यात बदल घडवून आणण्याचे काम सुरु आहे असं प्रवक्त्याने सांगितले, ऑगस्टच्या घोषणेनुसार कंपनीने हे पाऊल उचलले आहे. कर्मचार्‍यांच्या तुटवड्यामुळे १७ ते ९ युनिटमध्ये काम कमी झाले आहे. ग्लोबल सेव्हरन्स प्रोग्राममधून ३५०० दशलक्ष ते ५५०० दशलक्ष डॉलर्स खर्च होण्याची कंपनीची अपेक्षा आहे.

नफ्यात 33 टक्के घट

तिसऱ्या तिमाहीत कोका-कोला ३३ टक्क्यांनी घटून १.७ अब्ज डॉलर्सवर आला आहे. त्याच वेळी कंपनीच्या महसुलात नऊ टक्क्यांनी घट होऊन ती ८.७ अब्ज डॉलरवर गेली आहे.

Web Title: Coronavirus Pandemic Affect Coca Cola To Layoff 2200 Employees As Profit Is Reduced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.