नवी दिल्ली : कोविड-१९ साथीमुळे आपापल्या गावी परतलेल्या कामगारांना कामावर बोलावण्यासाठी भारतातील कारखान्यांनी अनेक सवलती देऊ केल्या आहेत. काही कंपन्यांनी मोफत प्रवास तिकिटे, राहण्यासाठी घरे आणि अन्न यासारख्या सवलती जाहीर केल्या आहेत. काही कंपन्या नजीकच्या ठिकाणी नवे कामगार शोधत असून, काही कंपन्या कामगारांचा ‘नवे आणि जुने’ असा मेळ बसविताना दिसत आहेत.
‘लिनफॉक्स लॉजिस्टिक्स इंडिया’चे भारतातील व्यवस्थापक (कंट्री मॅनेजर) व्ही. व्ही. वेणुगोपाल यांनी सांगितले की, कामगारांना कामावर परत आणण्यासाठी आम्ही अन्न आणि इतर प्रोत्साहन लाभ देऊ केला आहे.
कोविड-१९ मुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे लाखो कामगार आपापल्या राज्यात परतले आहेत. यात बिहार, उत्तर प्रदेश आणि प. बंगाल या राज्यांतील मजुरांची संख्या अधिक होती. आता सरकारने लॉकडाऊन उठवून अर्थव्यवस्था पुन्हा खुली करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. कारखाने सुरू होत आहेत. तथापि, त्यासाठी आवश्यक असणारी श्रमशक्तीच उपलब्ध नसल्यामुळे उद्योगांच्या अडचणी वाढल्या आहेत.
केरळातील साऊदर्न प्लायवूड गु्रप कंपनीचे संस्थापक एम. के. हमसा यांनी सांगितले की, माझ्याकडे ५०० स्थलांतरित मजूर होते. त्यांनी पुन्हा कामावर परतावे यासाठी मी त्यांना अन्न आणि इतर सुविधा देत आहे.
कामगारटंचाईचा बांधकामांना फटका
‘कामगारटंचाईचा फटका बांधकाम क्षेत्रास बसला आहे. त्यामुळे प्रकल्प पूर्ण होण्यास किंचित उशीर होऊ शकतो’, असे राष्ट्रीय वास्तव संपदा विकास परिषदेचे अध्यक्ष राजन बांदेलकर यांनी म्हटले आहे.
कामगारांना परत आणण्यासाठी हरतºहेचे प्रयत्न संस्था करीत आहे. प्रसंगी विमानांचा वापर करण्याची तयारीही आम्ही केली आहे, असेही त्यांनी सांगितले.
coronavirus: कामगारांना परत बोलावण्यासाठी सवलतींचा वर्षाव
कामगारांना कामावर परत आणण्यासाठी आम्ही अन्न आणि इतर प्रोत्साहन लाभ देऊ केला आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2020 01:18 AM2020-07-07T01:18:53+5:302020-07-07T01:19:01+5:30