सूरत : चीनमधीलकोरोना विषाणूचा फटका आता व्यापारावरही होत असल्याचे दिसून येत आहे. कोरोना विषाणूमुळे सुरतमधील हीरे उद्योगाला 8,000 कोटी रुपयांचा फटका बसण्याची शक्यता आहे.
सुरतमधील हीरे उद्योगासाठी हाँगकाँग एक मोठे केंद्र आहे. मात्र, हाँगकाँगमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार होत असल्याने तेथे आपत्कालीन स्थिती जाहीर करण्यात आली आहे. यामुळे सुरतच्या हिरे उद्योगास 8,000 कोटी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. कारण, पुढील दोन महिने तेथे केली जाणारी हिऱ्यांची निर्यात बंद राहू शकते. मार्चपर्यंत हाँगकाँगने आयात व इतर व्यवहार बंद केले आहेत.
'जेम्स ज्लेवरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल'चे अध्यक्ष दिनेश नवाडिया यांनी सांगितले की, दरवर्षी सूरतवरुन 50,000 कोटी रुपयांचे पॉलिश्ड हीरे हाँगकाँगला एक्सपोर्ट होतात. हे सूरतच्या एकूण हिरे एक्सपोर्टच्या 37% आहे. याचबरोबर, हाँगकाँगमध्ये मार्चपर्यंत सुट्या घोषित केल्या आहेत. गुजरातच्या ज्या व्यापाऱ्यांचे तिथे ऑफिस आहे, त्यांना परत पाठविण्यात आले आहे. जर ही परिस्थिती सुधारली नाही, तर याचा व्यापारावर मोठा परिणाम पडेल. देशात आयात होणाऱ्या हिऱ्यापैकी 99% सूरतमध्येच पॉलिश होतात, असेही दिनेश नवादिया यांनी सांगितले.
Gujarat: Diamantaires in Surat say that #CoronavirusOutbreak in China and Hong Kong will affect their business, have a negative impact on the diamond industry of India and bring them a loss of around Rs 8,000-10,000 Crores in the next two months. (05.02.2020) pic.twitter.com/2BLrBrzp5D
— ANI (@ANI) February 6, 2020
याशिवाय, हाँकाँगमध्ये पुढच्या महिन्यात इंटरनॅशनल ज्वेलरी एग्जिबिशन आहे. मात्र, कोरोना विषाणूमुळे हा कार्यक्रम रद्द होऊ शकतो. त्यामुळे जर असे झाले तर सूरतच्या ज्वेलरी बिझनेसला मोठे नुकसान होईल, कारण या इंटरनॅशनल एग्जिबिशनमध्ये हिऱ्यासोबतच ज्वेलरीदेखील विकली जाते, असे हीरे व्यपारी प्रवीण नानावती यांनी सांगितले.
दरम्यान, चीनमध्ये कोरोनाच्या विषाणूमुळे बळी गेलेल्यांची संख्या 490 वर पोहोचली आहे. त्या देशात या विषाणूची लागण आतापर्यंत 24, 324 जणांना झाली आहे. मंगळवारी रात्रीपर्यंत आणखी 65 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. त्याचप्रमाणे या विषाणूचा संसर्ग झालेले 3,887 नवे रुग्ण आढळून आले. हुबेई प्रांतातील 431 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.
चीनमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांपैकी 3,219 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे, तर संपूर्ण देशात उपचारानंतर 892 लोक बरे झाले आहेत. या रुग्णांच्या सतत संपर्कात असलेल्या सुमारे अडीच लाख लोकांचीही वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.हाँगकाँगमध्ये 18 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले असून, त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. मकाऊमध्ये 10 तर तैवानमध्ये 11 रुग्ण आहेत. कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी चीनमध्ये हजार खाटांचे रुग्णालय सोमवारी सुरू करण्यात आले होते, तर 1300 खाटांचे रुग्णालय बुधवारपासून सुरू झाले.
महत्त्वाच्या बातम्या
विश्व हिंदू महासभेचे अध्यक्ष रणजीत बच्चन यांचा मारेकरी सापडला; मुंबईतून अटक
'श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र' ट्रस्टला मिळालं पहिलं दान, मोदी सरकारनं दिला एक रूपया!
विचित्र अपघात; रनवेवर उतरताना विमानाचे तीन तुकडे झाले
महिला अत्याचारविरोधी कठोर कायदा राज्यातही; आंध्रच्या ‘दिशा’चे अनुकरण
कर्जमाफीचा ३४ लाख शेतकऱ्यांना फायदा; लाभार्थींची नावे जाहीर करणार