भारतामध्ये लॉकडाऊन सुरू होऊन १२६ दिवस उलटले आहेत. बाहेरच्या जगाशी संपर्क तोडून आपण आपल्यासाठी सर्वांत सुरक्षित स्थळ असलेल्या आपल्या घरात आहोत. तरीही आपल्या स्मृतीतील हा सर्वांत घडामोडींनी भरलेला काळ आहे. दूरस्थपणे काम आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन काही महिने केल्यानंतर आता तुमचा संयम संपू पाहत आहे.
आता थकवून टाकणारा प्रवास न करता घरातूनच काम करायचे आहे ही कल्पना प्रथम आपल्याला सुखद वाटली होती. कुटुंबासोबत घालवण्यासाठी अखेर थोडा जास्त वेळ मिळाला होता. पण आता परिस्थिती आपल्याला तेवढी सोपी वाटत नाही आहे. घरातील कधीच न संपणाऱ्या कामांनी आपण शारीरिक व मानसिक दोन्ही आघाड्यांवर थकलो आहोत. आणि घरातून काम म्हणजे प्रत्यक्षात जास्त काम.
अनेकांसाठी हा काळ आर्थिक दृष्टीनेही कठीण ठरत आहे. डाऊनसायझिंगमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, काहींना पगारात कपात सहन करावी लागत आहे. तरीही काहीजण या परिस्थितीतूनही मार्ग काढत आहेत हे प्रशंसनीय आहे! हो, हे सत्य आहे. ज्यांच्याकडे किमान सहा महिने पुरतील एवढा आपत्कालीन निधी आहे, त्यांच्याबद्दलच आपण बोलत आहोत. ते या कठीण परिस्थितीतून बाकीच्यांच्या तुलनेत अधिक चांगल्या पद्धतीने मार्ग काढत आहेत.
ज्यांनी आमचे संस्थापक अजित दयाळ यांची शिफारस गांभीर्याने घेतली आणि आकस्मिक संकटांसाठी तरतूद म्हणून २४ महिन्यांचा खर्च भागेल एवढी रक्कम बाजूला टाकली त्यांची परिस्थिती आणखी चांगली आहे. हो, आम्ही आमच्या सर्व गुंतवणूकदारांना कायम आर्थिक सज्जतेचे महत्त्व पटवून दिले आहे. आणि या साथीचा फटका आपल्याला बसला त्याच्या आधीपासून आम्ही हे सांगत होतो. हे आता वैकल्पिक उरलेले नाही. हे गंभीर आहे.
दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर प्रत्येकाने आर्थिक तंदुरुस्ती राखणे अत्यावश्यक आहे. तर ही आर्थिक तंदुरुस्ती म्हणजे नेमके काय? आपण आपल्या शरीराची तंदुरुस्ती राखतो, तशीच आर्थिक तंदुरुस्तीही राखणेही गरजेचे आहे. आपल्या पैशाची व्यवस्था नीट करणे, शक्य तेथे खर्च कमी करणे आणि पैसा उत्तम रितीने वाढू देणे हा आर्थिक तंदुरुस्तीचा गुरूमंत्र आहे. तेव्हा आता तुम्ही तयार असाल तर, तुमची आर्थिक स्थिती आजपर्यंत कधीही नव्हती एवढ्या चांगल्या आकारात ठेवण्यासाठी आमच्या काही शिफारशी आहेत.
१. तुमच्या रोख रकमेच्या प्रवाहाचे विश्लेषण करा- तुमच्याकडील पैशाच्या प्रवाहाचा अभ्यास करण्यासाठी बँक स्टेटमेंटचा अभ्यास करा. गेल्या काही महिन्यांतील तुमच्या उत्पन्न व खर्चांचा विचार करून “जास्तीचा मेद हटवण्याची” गरज असलेली क्षेत्रे निश्चित करा. तुम्हाला घरी असताना गरज भासत नाही अशा गोष्टी वजा करून टाका. सुरक्षितता, औषधे, घर आणि अन्न या गरजांवर खर्च केंद्रित करण्याचे उद्दिष्ट ठेवा.
२. ईएमआयबाबत पुन्हा बोलणी करा- तारण आणि भाडे हे बजेटमधील सर्वांत महागडे घटक आहेत. तुम्हाला बिले चुकती करून टाकणे शक्य असेल, तर ती चुकती करून टाका. सध्याच्या काळात ईएमआय स्वस्त झाले आहेत, त्यामुळे तुमच्या बँकेसोबत त्याबाबत बोलणी करा. सध्याच्या काळाचा विचार करता घरमालक भाडे कमी करू शकतात का, याविषयी त्यांच्याशी बोला.
३. उत्पन्नाचे आणखी काही स्रोत शोधा- अपवर्क किंवा फ्रीलान्सोर यांसारख्या साइट्स सध्या फ्रीलान्सर्सना जोरात काम देत आहेत. एखादे पुस्तक लिहिणे, ऑनलाइन ट्युटरिंग, ड्रॉप शिपिंग या सध्या उत्पन्नाचा आणखी एक स्रोत मिळवण्यासाठी उत्तम कल्पना आहेत. तुम्ही एखादा व्यवसाय सुरू करण्याचाही विचार करू शकता.
४. आपत्कालीन निधी उभा करा- लॉकडाउनच्या काळात दैनंदिन खर्चातून जो पैसा वाचत आहे, त्याचा उपयोग आपत्कालीन निधी उभा करण्यासाठी करा.
आदर्श स्थिती म्हणजे तुमच्याकडे २४ महिन्यांचा खर्च भागवता येईल एवढी रक्कम आपत्कालीन निधी म्हणून हवी. ही संकल्पनाच ज्यांच्यासाठी नवीन आहे ते एक महिन्यापासून सुरू करू शकतात, मग दोन महिने पुरतील एवढे पैसे साठवा आणि हा कालावधी वाढवत राहा.
जर तुमच्याकडे पूर्वीपासून तगडा आपत्कालीन निधी असेल, तर तुमच्या निवृत्तीसाठीच्या निधीत अधिक पैसा घालण्याचा (contributing more to your retirement fund) विचार करा.
तुम्हाला कायमच काटकसरीची जीवनशैली स्वीकारावी लागेल असे नाही. तुमची मौल्यवान आर्थिक संसाधने सुरक्षित ठेवण्यासाठी हा आत्ताचा फिटनेस मंत्र आहे. निकोप गुंतवणूक पोर्टफोलिओचे लाभ घेण्यासाठी याचे पालन करा. यामुळे तुमचे चांगले रक्षण होईल आणि कोणत्याही संकटाच्या काळात तुम्ही आत्मविश्वासाने मार्ग काढू शकाल.
अस्वीकृती, वैधानिक तपशील आणि धोक्याचे घटक:
या लेखात/व्हिडिओत व्यक्त करण्यात आलेली मते सामान्य माहिती म्हणून आणि केवळ वाचनाच्या हेतूने आहेत आणि त्यातून वाचकाच्या कोणत्याही कृतीसाठी मार्गदर्शन किंवा शिफारस केलेली नाही. सार्वजनिकरित्या उपलब्ध माहिती, अंतर्गत स्तरावर विकसित डेटा आणि खात्रीशीर वाटणाऱ्या अन्य स्रोतांच्या आधारे हा लेख तयार करण्यात आला आहे. त्यामुळे यातील माहितीवर आधारित कोणतीही कृती करण्याची विनंती यात नाही. यातील तथ्ये अचूक असावीत आणि व्यक्त केलेली मते आजच्या तारखेनुसार न्याय्य व वाजवी असावीत यासाठी योग्य ती काळजी घेण्यात आली आहे. या लेखाच्या वाचकांनी कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी त्यांच्या स्वत:च्या अन्वेषणातून आलेल्या माहिती/डेटावर अवलंबून राहावे आणि स्वतंत्र व्यावसायिक स्तरावरील सल्ला घ्यावा असा सल्ला आम्ही देतो.
अस्वीकृती, वैधानिक तपशील आणि धोक्याचे घटक:
या लेखात/व्हिडिओत व्यक्त करण्यात आलेली मते सामान्य माहिती म्हणून आणि केवळ वाचनाच्या हेतूने आहेत आणि त्यातून वाचकाच्या कोणत्याही कृतीसाठी मार्गदर्शन किंवा शिफारस केलेली नाही. सार्वजनिकरित्या उपलब्ध माहिती, अंतर्गत स्तरावर विकसित डेटा आणि खात्रीशीर वाटणाऱ्या अन्य स्रोतांच्या आधारे हा लेख तयार करण्यात आला आहे. त्यामुळे यातील माहितीवर आधारित कोणतीही कृती करण्याची विनंती यात नाही. यातील तथ्ये अचूक असावीत आणि व्यक्त केलेली मते आजच्या तारखेनुसार न्याय्य व वाजवी असावीत यासाठी योग्य ती काळजी घेण्यात आली आहे. या लेखाच्या वाचकांनी कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी त्यांच्या स्वत:च्या अन्वेषणातून आलेल्या माहिती/डेटावर अवलंबून राहावे आणि स्वतंत्र व्यावसायिक स्तरावरील सल्ला घ्यावा असा सल्ला आम्ही देतो.
(म्युच्युअल फंडातील गुंतवणुका या बाजारपेठेतील जोखमींच्या अधीन असतात, योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक वाचन करा.)
(हा लेख क्वांटम म्युच्युअल फंडमधील पर्सनल फायनान्स तज्ज्ञांनी लिहिला आहे)
CoronaVirus News: कोरोनाचा परिणाम अन् त्यांनतरच्या आव्हानांसाठी तुमची आर्थिक तंदुरुस्ती वाढवा
CoronaVirus News: कोरोनाचं संकट आणि त्यानंतर येणारा काळ कठीण असणार आहे. त्यामुळे त्यासाठी तयारी करणं गरजेचं आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 03:21 PM2020-08-21T15:21:19+5:302020-08-27T15:23:29+5:30