मुंबई - रिझर्व्ह बँकेकडून सरकारी बँकांमधील कॉर्पोरेट कर्जांचे विशेष लेखा परीक्षण केले जाणार आहे. पीएनबी घोटाळ्यानंतर बँकेने हे ठोस पाऊल उचलले आहे. यामध्ये विशेषत: ‘एलओयू’ची पाहणी होणार आहे.
नीरव मोदीच्या १३ हजार कोटी रुपयांच्या पीएनबी घोटाळ्यानंतर सरकारी बँकांची फसवणूक केल्याची आणखी दोन प्रकरणे उजेडात आली आहेत. पीएनबी घोटाळा हा लेटर आॅफ अंडरटेकिंगमुळे (एलओयू) घडला होता. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने आता विशेष लेखा परीक्षणाद्वारे याच एलओयूंची पाहणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
संबंधित सूत्रांनुसार, सर्वाधिक कर बुडवे हे कॉर्पोरेट श्रेणीतील आहेत. त्यामुळे रिझर्व्ह बँकेकडून कॉर्पेरेट्सना देण्यात आलेल्या व्यावसाय व व्यापारी कर्जांचे परीक्षण सुरू केले जाणार आहे. यासोबतच रिझर्व्ह बँकेने सर्व सरकारी बँकांना एलओयू संदर्भातील पूर्ण माहिती तत्काळ देण्याची सूचना केली आहे. आतापर्यंत किती
एलओयू कॉर्पोरेट्सना लिहून देण्यात आले, त्यांच्या रकमेची थकबाकी किती यांची माहिती मागविण्यात आली आहे.
कॉर्पोरेट कर्जांचे होणार लेखा परीक्षण
रिझर्व्ह बँकेकडून सरकारी बँकांमधील कॉर्पोरेट कर्जांचे विशेष लेखा परीक्षण केले जाणार आहे. पीएनबी घोटाळ्यानंतर बँकेने हे ठोस पाऊल उचलले आहे. यामध्ये विशेषत: ‘एलओयू’ची पाहणी होणार आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 02:01 AM2018-03-12T02:01:02+5:302018-03-12T02:01:02+5:30