वॉशिंग्टन : जगातील कॉर्पाेरेट जगतामध्ये भारतीय उच्चपदस्थ अधिकारी हे व्यवसाय वृद्धीमध्ये सर्वात चांगले असल्याचे मत व्यक्त होत असून, भारतीय वंशाच्या अधिकाऱ्यांना अधिक मागणी होऊ लागली आहे. जगातील विविध ११ देशांमध्ये आजच्या घडीला ५८ भारतीय वंशाचे अधिकारी अत्युच्च स्थानावर असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली ३.६ दशलक्ष व्यक्ती कार्यरत आहेत. १ ट्रिलियन अमेरिकन डॉलरचा महसूल या कंपन्या मिळवित आहेत.इंडियास्पोरा या संघटनेने जाहीर केलेल्या अहवालामध्ये ही माहिती जाहीर करण्यात आली आहे. या संघटनेने म्हटले आहे की, भारतीय अधिकाºयांच्या नेतृत्वाखाली जगभरातील विविध देशांमध्ये असलेले उद्योग चांगली प्रगती करताना दिसत आहेत. अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, सिंगापूर यांसह ११ विविध देशांमध्ये ५८ बडे अधिकारी हे विविध कंपन्यांचे नेतृत्व करीत आहेत. या अधिकाºयांच्या नेतृत्वाखाली या कंपन्यांनी वार्षिक सरासरी २३ टक्के वाढ नोंदविलेली आहे. शेअर बाजाराच्या एस अॅण्ड पी ५०० या निर्देशांकाने १० टक्के वाढ नोंदविली आहे. त्यापेक्षा या कंपन्यांची कामगिरी चांगली राहिली आहे, असे या अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. या कंपन्यांमध्ये जगभरामध्ये ३.६ दशलक्ष कर्मचारी काम करीत असून, या कंपन्यांचा एकत्रित महसूल हा एक ट्रिलियन अमेरिकन डॉलरपेक्षा जास्त आहे. या कंपन्यांचे बाजार भांडवलमूल्य ४ ट्रिलियन अमेरिकन डॉलर असल्याचे अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.या यादीमध्ये असलेल्या उच्चपदस्थ अधिकाºयांची नावे बघितली असता यापैकी बहुतेक हे भारतामधून स्थलांतरित झालेले आहेत, तर काही युगांडा, इथोपिया, इंग्लंड, अमेरिका आदी देशांमध्ये जन्मलेले मूळ भारतीयही आहेत. या यादीमध्ये टेक इंडस्ट्रीजचे प्रमुख सुंदर पिचाई, रोहम अॅण्ड हॅसचे राज गुप्ता, पेप्सिकोच्या इंद्रा नुई तसेच हरमन इंटरनॅशनलचे दिनेश पालिवाल, मास्टर कार्डचे अजय बंगा या प्रमुखांचा समावेश आहे.भारतीय अधिकाºयांकडे आगामी काळ ओळखण्याची दूरदृष्टी असून, ते आपल्या कंपन्यांमध्ये लिंग समानता पाळतात. तसेच वंश आणि वर्णद्वेषाला थारा देत नसल्याचे रंगास्वामी यांनी स्पष्ट केले. हे अधिकारी कोविड-१९ साथ, हवामान बदल तसेच अन्य जागतिक समस्यांबाबत योग्य पावले उचलित असल्याचे स्पष्टपणे अनुभवायला मिळाल्याचे त्यांनी सांगितले.सर्व वयोगटामधील अधिकारीजे उच्चपदस्थ भारतीय अधिकारी या यादीमध्ये आहेत, त्यांच्यामध्ये तरुणांपासून वृद्धांपर्यंतचा समावेश आहे. अवघ्या ३७ वर्षांपासून ७४ वर्षांपर्यंत या अधिकाºयांचे वय असून, त्यांच्या वयाची सरासरी ५४ असल्याचे इंडियास्पोराचे संस्थापक रंगास्वामी यांनी व्हर्च्युअल पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केले.भारतीय उच्चपदस्थ हे केवळ तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामधीलच असतात असा एक समज होता. तो या यादीने खोटा ठरविला असल्याचे रंगास्वामी यांनी स्पष्ट केले. विविध कंपन्यांचे नेतृत्व भारतीय अधिकारी करीत असून, त्यांचे नेतृत्व हे एकाच पठडीमध्ये काम करीत नसल्याचे या कंपन्यांच्या यादीकडे लक्ष टाकल्यास समजून येते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कॉर्पाेरेट जगतात भारतीय अधिकाऱ्यांचा बोलबाला, ११ देशांमध्ये ५८ बडे अधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 3:52 AM