Join us

PM केअर्स फंडासाठी मुकेश अंबानींकडून ५०० कोटी; बँकांमध्ये ICICI आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 2:48 PM

PM CARES Fund मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सकडून ५०० कोटी रुपये, तर ICICI बँकेकडून ८० कोटी रुपये पीएम केअर फंडासाठी देण्यात आले आहेत.

ठळक मुद्देपीएम केअर्स फंडातील माहिती समोररिलायन्स, टाटा समूह, आदित्य बिर्ला ग्रुप, अदानी ग्रुपकडून कोटींचे दानखासगी बँकांमध्ये ICICI, HDFC आघाडीवर

नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या संकटाशी लढण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पंतप्रधान आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांना मदत आणि सहकार्य निधी म्हणजेच पीएम केअर्स फंडासाठी (PM CARES Fund) सर्वाधिक देणगी देणाऱ्यांची नावे समोर आली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स, रतन टाटा यांच्या टाटा समूह आणि अन्य कंपन्यांकडून तसेच बँकिंग क्षेत्रातून किती देणग्या देण्यात आल्या, याबाबतची माहिती समोर आली आहे. त्यानुसार मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सकडून ५०० कोटी रुपये, तर ICICI बँकेकडून ८० कोटी रुपये पीएम केअर फंडासाठी देण्यात आले आहेत. (corporates banks and reliance tata group and other enterprises gave crore rupees in pm cares fund) 

पीएम केअर्स फंडासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांनी पीएम केअर्स फंडाच्या कामकाजात पारदर्शकता आणण्याची संविधानातील तरतुदीनुसार 'राज्य' म्हणून घोषित करावे आणि हा फंड माहिती अधिकाराअंतर्गत आणावा, अशी मागणी याचिकाकर्त्यांकडून करण्यात आली आहे. या याचिकेवरील पुढील सुनावणी २३ एप्रिल रोजी होणार आहे. 

ना प्रायव्हेट जॉब, ना बिझनेस... बेरोजगारीच्या संकटात तरुणांना हवीय सरकारी नोकरी 

कॉर्पोरेट कंपन्यांकडून मोठ्या दान

पीएम केअर्स फंडासाठी मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीकडून ५०० कोटी रुपये, रतन टाटा यांच्या टाटा समूहाकडून ५०० कोटी रुपये, आदित्य बिर्ला ग्रुपकडून ४०० कोटी रुपये आणि अदानी ग्रुपकडून १०० कोटी रुपये देण्यात आले, अशी माहिती समोर आली आहे. 

खासगी क्षेत्रातील बँकांचेही योगदान

खासगी क्षेत्रातील मोठ्या बँकांकडूनही पीएम केअर्स फंडासाठी कोट्यवधी रुपये देण्यात आले. ICICI बँक यात आघाडीवर असून, बँकेकडून या फंडासाठी ८० कोटी रुपये, HDFC बँकेकडून ७० कोटी रुपये, कोटक महिंद्रा बँकेकडून २५ कोटी रुपये देण्यात आले. याशिवाय बँकेतील कर्मचाऱ्यांच्या एक दिवसाच्या वेतनातून जमा झालेले १.९ कोटी रुपयेही पीएम केअर्स फंडासाठी देण्यात आल्याचे समोर आले आहे. 

दरम्यान, याचिकाकर्त्यांनी पीएम केअर्स फंडाचे ऑडीट करून त्याचा अहवाल सार्वजनिक करण्याचीही मागणी केली आहे. यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयाने निर्देश द्यावेत, असेही याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :निधीपंतप्रधाननरेंद्र मोदीरिलायन्सटाटाअदानीआयसीआयसीआय बँकएचडीएफसी