Join us

डोळ्यांच्या उपचारांचा खर्च हा व्यावसायिक खर्च नाही

By admin | Published: October 29, 2015 9:31 PM

वकील किंवा सॉलिसिटर यासारख्या एखाद्या व्यावसायिकाने डोळ््यांवरील उपचारांसाठी केलेला खर्च हा त्याच्या व्यावसायिक खर्चात येत नाही

मुंबई : वकील किंवा सॉलिसिटर यासारख्या एखाद्या व्यावसायिकाने डोळ््यांवरील उपचारांसाठी केलेला खर्च हा त्याच्या व्यावसायिक खर्चात येत नाही. परिणामी प्राप्तिकर कायद्यानुसार एकूण उत्पन्नाचा हिशेब करताना असा खर्च वजावटीस पात्र ठरत नाही, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.धिमंत हिरालाल ठक्कर या मुंबईतील एका सॉलिसिटरचा १९८६-८७ या वर्षासाठीचा प्राप्तिकर निर्धारित करताना उपस्थित झालेला हा मुद्दा गेली २० वर्षे प्रलंबितहोता. प्राप्तिकर अधिकारी, प्राप्तिकर आयुक्त (अपील) आणि प्राप्तिकर अपिली न्यायाधिकरण या सर्वांनी ठक्कर यांचे म्हणणे अमान्य केले होते.त्यानंतर प्राप्तिकर कायद्याच्या कलम २५६ (१) अन्वये हा मुद्दा निर्णायक निकालासाठी उच्च न्यायालयाकडे आला होता. न्या. एम. एस. संकलेचा व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने बुधवारी त्याचा वरीलप्रमाणे निकाल दिला.ठक्कर यांच्या डोळ््याची दृष्टी अधू झाली होती व त्यासाठी शस्त्रक्रिया करण्याची गरज होती. शस्त्रक्रियेपूर्वीच्या काही तपासण्या करण्यासाठी ते अमेरिकेत गेले व त्यासाठी झालेला ४३,६०० रुपयांचा खर्च त्यांनी त्या वर्षाचे प्राप्तिकर रिटर्न भरताना ‘व्यवसायासाठी केलेला खर्च’ दाखवून एकूण उत्पन्नातून त्याची वजावट घेतली.शांतिभूषण केसला जाखलामाजी केंद्रीय कायदामंत्री व ज्येष्ठ वकील शांतिभूषण यांनीही हृदयावरील शस्त्रक्रियेसाठी झालेल्या खर्चाची वजावट मागताना हाच मुद्दा मांडला होता व दिल्ली उच्च न्यायालयाने तो फेटाळला होता. ठक्कर यांचे म्हणणेही त्याच आधारे फेटाळले गेले. (प्रतिनिधी)न्यायालयाचे निष्कर्ष व निरीक्षणेडोळ््यांची दृष्टी चांगली असणे ही केवळ व्यवसायासाठी नव्हे ्रतर एकूणच माणूस म्हणून परिपूर्ण आयुष्य जगण्यासाठी आवश्यक बाब आहे.त्यामुळे डोळ््यांच्या उपचारांवरील खर्च हा निव्वळ आणि फक्त व्यवसायासाठी केलेला खर्च होत नाही. कोणीही माणूस व्यवसाय करत नसला तरी डोळ््यांनी चांगले दिसत नसेल तर उपचार करतोच.डोळ््यांनी नीट दिसत नसेल तर वकील किंवा सॉलिसिटर म्हणून काम करता येत नाही, असे नाही. याच उच्च न्यायालयात अंध असूनही अनेक वकील उत्तम काम करीत आहेत. अलिकडेच दिवंगत झालेले सधन गुप्ता हे अंध होते. तरी पश्चिम बंगालमध्ये ते अ‍ॅडव्होकेट जनरल होते.हाच तर्क लावायचा झाला तर व्यावसायिकाने स्वत:च्या खाण्यापिण्यावर केलेला खर्च ही व्यावसायिक खर्चात धरावा लागेल. कारण जगलो तरच व्यवसाय करू शकेन, असे तो म्हणेल. पण हे म्हणणे पूर्णपणे अतार्किक आहे.