Join us

१०० रुपये खर्च, ३०० विक्री, अवघ्या १० हजारात सुरू होणार हा जबरदस्त व्यवसाय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 7:29 PM

जर तुम्ही ते घाऊक बाजारात विकत घेतले तर यासाठी लागणारा कच्चा माल 10-12 हजार रुपयांना मिळू शकेल.

आजच्या काळात, अशा अनेक व्यवसाय कल्पना आहेत, ज्याची सुरुवात कमीतकमी गुंतवणुकीने करता येते. या कल्पनांची योग्य अंमलबजावणी केली तर कमी वेळात चांगला नफाही मिळवता येतो. असाच एक हंगामी व्यवसाय म्हणजे मच्छरदाणीचा. वर्षातील सहा ते आठ महिन्यांमध्ये याला प्रचंड मागणीही असते. दरवर्षी उन्हाळा आणि पावसाळ्यात मच्छरदाण्यांना चांगली मागणी असते, ती स्थानिक पातळीवरही पूर्ण होऊ शकते.

या व्यवसायासाठी नेट आणि धागा हेच मुख्य कच्चा माल आहे. मच्छरदाणीचे साधारणपणे दोन प्रकार असतात पहिला म्हणजे कॉटन आणि दुसरा म्हणजे सिंथेटिक. जर तुम्ही घाऊक बाजारात विकत घेतले तर तुम्हाला 10-12 हजार रुपयांना संपूर्ण नेट रोल मिळू शकतो. तुम्ही घरातही एखाया व्यक्तीकडून मच्छरदाणी शिवून घेऊ शकता. एका रोलमध्ये अनेक मच्छरदाणी सहज तयार होतात. त्यांची विक्री करूनही चांगला परतावा मिळतो.

बहुतेक सिंगल बेड आणि डबल बेड मच्छरदाण्यांना बाजारात मागणी आहे. याशिवाय लहान मुलांसाठी वेगवेगळ्या डिझाइनमध्ये मच्छरदाण्या विकल्या जातात. सिंगल बेड मच्छरदाणीबद्दल बोलायचे झाले तर त्याचा खर्च 100 रुपयांपर्यंत जातो, तर बाजारात ती  सहजरित्या 300 रुपयांना विकली जाऊ शकते. तसेच डबल बेड मच्छरदाणी बाजारात 600 ते 700 रुपयांना विकली जाते, तर त्यांचा खर्च 200 रुपयांपेक्षा कमी आहे. अशा प्रकारे मच्छरदाणीच्या व्यवसायात सहजरित्या तीनपट परतावा मिळवता येतो.

यामध्ये लगेच खराब होणाऱ्या वस्तूही नसल्यानं यात नुकसानीची जोखीमही कमी आहे. महत्त्वाचं म्हणजे या सेगमेंटमध्ये ब्रँडेड प्रोडक्ट्सचं वर्चस्वही नाही ही उत्तम बाब आहे. तुम्हाला यासाठी आसपास दुकानं शोधण्याची गरज आहे. तसंच तुम्हाला तुमचा प्रोडक्ट विकण्यासाठी त्यांना तयार करावं लागणार आहे. मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय करायचा असल्यास तुम्हाला एक्सपोर्टचा पर्यायही उपलब्ध आहे.

टॅग्स :व्यवसाय