- उमेश शर्मा
अर्जुन : कृष्णा , लॉकडाउन बऱ्याच व्यावसायिकांना त्रासदायक ठरत आहे. या काळात होणाºया व्यवसायासाठी आयटीसी घ्यावे की नाही अशा द्विधा अवस्थेत अनेक व्यावसायिक आहेत.
कृष्ण : अर्जुना, लॉकडाउनमुळे येणाºया अडचणी दूर करण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. लॉकडाउनमध्ये झालेल्या व्यवहारांवर जीएसटी -आयटीसी संबंधातील काही मुद्दे सरकारकडून यायचे अद्याप बाकी आहेत, त्यावर सविस्तर चर्चा करूया.
अर्जुन : कृष्णा, लॉकडाउन काळामध्ये व्यावसायिकांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी केलेल्या खर्चावर आयटीसी पात्र आहे का?
कृष्ण : अर्जुना, सरकारने काही बंधनकारक मार्गदर्शक सूचनांसह विविध प्रकारच्या सेवा आणि व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्यात फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्यासह कामाच्या ठिकाणी योग्य स्वच्छता, प्रवेशद्वारावर थर्मल स्क्रीनिंग आणि मास्कचा वापर अनिवार्य आहे. त्याचा आयटीसीवर होणारा परिणाम पाहू.
१) सॅनिटायझर, मास्क, ग्लोव्हज, थर्मल स्कॅनर, हँडवॉशर अशा खचार्साठी आयटीसी पात्र ठरेल. कोविड १९ मार्गदर्शक सूचनेनुसार असे खर्च करणे बंधनकारक आहे.
२) कर्मचाºयांचा समूह विमा आणि प्रीमिअम मॅच्युरिटीचा फायदा कंपनीला होत असल्यास आणि कोविड १९ च्या मार्गदर्शनानुसार समूह वैद्यकीय विमा आयटीसी पात्र ठरेल. वैयक्तिक विमा पॉलिसीवरील आयटीसी-सीजीएसटी कायद्यातील कलम १७ (५) मध्ये प्रतिबंधित केले आहे.
३) कंपनी कायदा २०१३ नुसार ज्या कंपन्यांना सीएसआरमध्ये खर्च करणे अनिवार्य आहे, अशा कंपनीने जर मास्क, ग्लोव्हज, खाद्यपदार्थ, इतर आवश्यक वस्तू आणि सेवा यावर लॉकडाउन काळात त्यांचे कर्मचारी आणि इतरांसाठी खर्च केल्यास त्यावर आयटीसी लागू होईल. मात्र केरळमधील प्लायका व वायर्स लिमिटेडच्या एएआरनुसार सीएसआर खर्चावरील आयटीसीला नकार देण्यात आला. कंपनी कलम १७ (५) ( ब) अंतर्गत सीजीएसटी कायद्यानुसार खर्चावर आयटीसी घेण्यास परवानगी आहे. त्यामुळे कर्मचाºयांसाठी केलेल्या खर्चावर आयटीसी घेता येईल.
अर्जुन : कृष्णा, आयटीसीसाठी जीएसटीच्या इतर कोणत्या मुद्द्यांवर करदात्यांनी लक्ष दिले पाहिजे?
कृष्ण : अर्जुना, वर चर्चा केलेल्या तरतुदी सोडून खालील काही मुद्द्यांंवर करदात्यांनी लक्ष दिले पाहिजे.
च्वस्तू आणि सेवांचा इनवर्ड सप्लाय झाला आहे, परंतु त्यावरील पेमेंट १८० दिवसात झाले नाही अशा वरील आयटीसी रिव्हर्स करावा लागेल.
च्सीजीएसटी नियम ३६ (४)नुसार जीएसटीआर २ (ए) मध्ये असणाºया या आयटीसीच्या 10 टक्के आयटीसी जीएसटीआर ३ बी दाखल करताना प्रोव्हिजनल बेसिसवर करदाते घेऊ शकतात. आता करदाते फेब्रुवारी ते आॅगस्ट २०२० पर्यंतच्या आयटीसीचा दावा सप्टेंबर २०२० मध्ये एकत्रितपणे करू शकतात.
च्लॉकडाउनमुळे चोरीला गेलेल्या, हरविलेल्या आणि खराब झालेल्या मालावरील आयटीसी : अ - माल हरवल्यास, चोरीला गेल्यास अथवा नष्ट झाला असल्यास तो इनपुट म्हणजे कच्चा आणि उपभोग्य (कन्झुमेंबल) असल्यास त्यावरील आयटीसी रिव्हर्स करावा लागेल. अशा स्थितीत या वस्तूंची किंमत विम्यासाठी आयटीसीसह मानली जाईल.
ब - स्टोरेजमध्ये नष्ट झालेल्या, खराब, किंवा हरवलेल्या वस्तू फिनिश गुड असल्यास त्यावरील आयटीसी रिव्हर्स करण्याची गरज नाही.
क- वस्तू वाहतुकीत नष्ट झाल्यास, हरवल्यास अथवा चोरीला गेल्यास त्यावर आयटीसी घेता येणार नाही. कारण अशा वस्तू मालकापर्यंत पोहोचलेल्या नसतात. त्यामुळे त्या वस्तू फिनिश गुड असल्या तरी आणि रिस्क आॅर्डरचे हस्तांतर झाले असले तरी त्यावर आयटीसी घेता येणार नाही.
च्जे व्यापार, उत्पादन आणि उद्योग तात्पुरते थांबले आहेत, अशांवर लॉकडाउन काळात होणाºया खर्चावर आयटीसीचा दावा व्यावसायिकांना करता येईल. उत्पादन, व्यवसाय बंद पडले आहेत, त्यांना आयटीसी उपयोगाचे नसल्यास ते रिव्हर्स होईल.
अर्जुन : कृष्णा, यातून काय बोध घ्यावा?
कृष्ण : अर्जुना, लॉकडाउनमुळे व्यवसाय आणि अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होत आहेत.
सरकारने उपाययोजना करूनही अनेक प्रश्न सुटलेले नाहीत. कित्येक प्रकरणात सीएसआर संबंधातील आयटीसी घेण्यास परवानगी नाही. कायद्यानुसार अनिवार्य अशा बाबींवर सरकारने स्पष्टीकरण
दिले पाहिजे.
अर्जुन : कृष्णा, लॉकडाउनमध्ये वर्क फ्रॉम होमची मुभा दिली जात आहे. अशा खर्चावर आयटीसी पात्र आहे का?
कृष्ण : अर्जुना, वर्क फ्रॉम होमसाठी संगणक उपकरण, हाय स्पीड इंटरनेट, नवीन संगणकीय प्रणाली, आयटी इन्फ्रास्ट्रक्चर आणि इतर
अनेक गोष्टींची आवश्यकता असते. या खर्चाचे वर्गीकरण खालीलप्रमाणे करता येईल.
च् घरून काम करण्यासाठी संगणक, लॅपटॉप, इंटरनेट सेवेवर खर्च केला असल्यास आणि त्याच्या पावत्या व्यवसायाच्या नावे असल्यास त्या आयटीसीसाठी पात्र ठरतील.
च् जर वर्क फ्रॉम होममध्ये कर्मचाºयांसाठी खर्च केला आणि त्यावरील खर्चाची भरपाई केली असल्यास असे खर्च आयटीसीसाठी पात्र ठरणार नाहीत.