मुंबई/कराची : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शत्रुत्व वाढल्यामुळे दोन्ही देशांतील सुमारे ८२२ दशलक्ष डॉलरचा कापूस व्यापार ठप्प झाला आहे. संबंधातील अनिश्चिततेमुळे व्यावसायिकांनी नवे करार करण्याचे काम थांबविले आहे.
पाकिस्तान हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा कापूस ग्राहक आहे. सप्टेंबरमध्ये पाकची कापूस खरेदी सुरू होते. गेल्या दोन आठवड्यांत मात्र पाकिस्तानातील व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या कापसाविषयीची चौकशी कमालीची घटली आहे, असे भारतीय निर्यातदारांनी सांगितले. पाकिस्तानातील आयातदारांनी आम्ही भारतातून आयात करणार नसल्याचे वृत्तसंस्थेला सांगितले. पाकिस्तान कॉटन डिलर्स असोसिएशनचे चेअरमन इहसानुल हक यांनी सांगितले की, याक्षणी कापूस व्यापार पूर्ण थांबला आहे. अनिश्चितता हे त्याचे प्रमुख कारण आहे. दोन्ही देशांत युद्ध भडकल्यास काय होईल, अशी चिंता व्यापाऱ्यांना वाटते. त्यामुळे कोणीही व्यवहार करायला तयार नाहीत.
महाराष्ट्रातील जळगाव येथील जिनर प्रदीप जैन यांनी सांगितले की, अनेक कापूस निर्यातदार पाकिस्तानला कापूस विकण्यास अनिच्छुक आहेत. ते अन्य बाजारपेठांच्या शोधात आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)
पाकिस्तानला होणारी कापूस निर्यात घसरली
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शत्रुत्व वाढल्यामुळे दोन्ही देशांतील सुमारे ८२२ दशलक्ष डॉलरचा कापूस व्यापार ठप्प झाला आहे.
By admin | Published: October 11, 2016 05:22 AM2016-10-11T05:22:05+5:302016-10-11T05:22:05+5:30