अकोला : कापूस उत्पादनात प्रचंड घट झाली असून, एक-दोन फेऱ्यांतच अनेक ठिकाणी कापसाचा वेचा संपायला आला आहे. बाजारभाव पूरक नसल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. हमीदराने तर शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडल्याने शासनाकडून यावर्षी तरी अग्रिम बोनस मिळेल का, याकडे राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अग्रिम बोनस देण्याबाबत शासन अनुकूल असल्याची घोषणा राज्याचे महसूल तथा कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी गतवर्षी अकोल्यात केली होेती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या; पण शासनाने बोनसला खो दिला. असे असतानाही अग्रिम बोनसच्या भरवशावर गतवर्षी शेतकऱ्यांनी पणन महासंघाला मोठ्या प्रमाणात कापूस विकला.
यावर्षी भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) कापूस खरेदी सुरू केली नसून, पणन महासंघानेही मोजकीच कापूस खरेदी केंद्रे सुरू केली आहेत. नोव्हेंबर महिना संपायला आला असताना कापसाची आवक मात्र गतवर्षीच्या तुलनेत कमी आहे. व्यापाऱ्यांनी आतापर्यंत १५ लाख क्ंिवटलच्यावर कापसाची खरेदी केली आहे. दरम्यान, कापूस एकाधिकार योजना सुरू असताना शेतकऱ्यांना पणन महासंघामार्फतच अग्रिम बोनस देण्यात येत होता; परंतु एकाधिकार योजना गुंडाळल्यानंतर अग्रिम बोनस बंद झाला.
कापूस उत्पादकांना अग्रिम बोनसची प्रतीक्षा
कापूस उत्पादनात प्रचंड घट झाली असून, एक-दोन फेऱ्यांतच अनेक ठिकाणी कापसाचा वेचा संपायला आला आहे. बाजारभाव पूरक नसल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन
By admin | Published: November 22, 2015 11:43 PM2015-11-22T23:43:42+5:302015-11-22T23:43:42+5:30