राजरत्न सिरसाट, अकोला
देशात कापसाचा हंगाम सुरू झाला असून, आजमितीस दोन लाख क्विंटल कापसाची व्यापाऱ्यांनी खरेदी केली आहे. देशात ७८ लाख गाठी कापूस शिल्लक असून, चीनला होणारी कापसाची निर्यात बंद असल्याने देशातील खासगी बाजारात कापसाचे दर ४१०० ते ४,१५० रुपये प्रतिक्ंिवटल आहेत. यापुढे दर वाढतील की नाही, या बाबतीत मात्र व्यापाऱ्यांमध्ये साशंकता आहे.
मागील वर्षी देशात ३ कोटी ७० लाख गाठी कापसाचे उत्पादन झाले होते. भारतात कापड उद्योग, कारखाने, सूतगिरण्यांकडे २५ लाख गाठी शिल्लक आहेत. भारतीय कापूस महामंडळाकडे (सीसीआय) २७ लाख शिल्लक असून, यातील १४ लाख गाठी विकलेल्या असल्याचे सांगण्यात येत आहे.
शासनाचे हमी दर प्रतिक्ंिवटल ४१०० रुपये आहेत. परंतु गतवर्षी सीसीआयने शेतकऱ्यांना प्रतवारी बघून कापसाचे दर ठरवल्याने राज्यातील शेतकऱ्यांना ३९०० ते ३९५० रुपये प्रतिक्ंिवटल याप्रमाणे कापूस विकावा लागला. या पृष्ठभूमीवर यावर्षी शेतकऱ्यांनी कापूस विक्रीला काढला आहे. खासगी बाजारात हमी दरापेक्षा ५० ते १०० रुपये अधिक दर शेतकऱ्यांना दिले जात असल्याने दररोज आवक वाढत आहे.
कापसाचे दर यंदाही स्थिर!
देशात कापसाचा हंगाम सुरू झाला असून, आजमितीस दोन लाख क्विंटल कापसाची व्यापाऱ्यांनी खरेदी केली आहे. देशात ७८ लाख गाठी कापूस शिल्लक असून, चीनला होणारी कापसाची निर्यात
By admin | Published: November 2, 2015 12:08 AM2015-11-02T00:08:21+5:302015-11-02T00:08:21+5:30