अकोला : देशातील अनेक राज्यांमध्ये समाधानकारक पाऊस न झाल्याने, तुरीच्या उत्पादनासोबतच कापसाचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. यंदाच्या चालू हंगामात कापसाचे उत्पादन किमान २0 लाख गाठींनी घसरण्याची शक्यता असल्याची माहिती कृषी विभागाकडून प्राप्त झाली आहे.
गतवर्षी देशामध्ये ३ कोटी ७0 लाख कापसाच्या गाठींचे उत्पादन झाले होते. यंदा ३ कोटी ५0 लाख कापसाच्या गाठींचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. देशातील कर्नाटक, पंजाब, महाराष्ट्र आणि हरियाणा हे प्रमुख कापूस उत्पादक राज्य आहेत. परंतु कर्नाटक, पंजाब व हरियाणामध्ये सुद्धा यंदा पावसाचे कमी प्रमाण असल्याने, या राज्यांमध्ये कापसाचे समाधानकारक उत्पादन होणार नसल्याने तब्बल २0 लाख कापसाच्या गाठींचे उत्पादन घसरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रात मात्र, कापसाचे चांगले उत्पादन होण्यासारखी परिस्थिती आहे. यंदा महाराष्ट्रात ८0 ते ८५ लाख कापसाच्या गाठींचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. गुजरातमध्ये सुद्धा एवढेच उत्पादन होते. महाराष्ट्रातील कापूस उत्पादनामुळे यंदा सीसीआयला जवळपास १ कोटी गाठी ठरवून दिलेल्या हमीभावानुसार खरेदी कराव्या लागणार आहेत. गेल्या हंगामातील स्टॉक ५२ लाख गाठींचा गृहित धरण्यात आला आहे. याशिवाय १२ लाख गाठींची आयात होईल, असाही अंदाज आहे. कापसाच्या गाठी आयात कराव्या लागल्या तर यंदा कापसाला हमीभावापेक्षाही अधिक भाव मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कापड व धागे उद्योगातील छोट्या प्रकल्पांमधून यंदा २८ लाख गाठींना मागणी राहील. ही मागणी गेल्या हंगामात २६.२८ लाख गाठींची होती. बिगर कापड उद्योगातून ११ लाख गाठींची खरेदी अपेक्षित आहे. निर्यात यंदा वाढून ६८ लाख गाठींवर जाईल, अशी शक्यता आहे.
२0 लाख गाठींनी कापसाचे उत्पादन घटणार
देशातील अनेक राज्यांमध्ये समाधानकारक पाऊस न झाल्याने, तुरीच्या उत्पादनासोबतच कापसाचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे.
By admin | Published: November 11, 2015 11:24 PM2015-11-11T23:24:23+5:302015-11-11T23:24:23+5:30