Join us  

ई-वाहनांबाबत देश ‘डिस्चार्ज’; महाराष्ट्राची आघाडी, मात्र लक्ष्य गाठण्यात सर्वच राज्ये मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 8:08 AM

भारतात गेल्या वर्षी लाखांहून अधिक ई-वाहनांची विक्री झाली. त्यामुळे क्षेत्रात झपाट्याने वाढ हाेणार असल्याचे बाेलले जात आहे

नवी दिल्ली : भविष्यातील वाहतुकीचे साधन म्हणून ई-वाहनांकडे पाहण्यात येत आहे. अलीकडच्या काळात वाहनांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, ई-वाहनांची संख्या वाढविणे, तसेच आवश्यक सुविधा उभारण्यासाठी निश्चित केलेले लक्ष्य गाठणे देशातील बहुतांश राज्यांना कठीण झाले आहे. याबाबत अभ्यास करून अहवाल सादर करण्यात आला आहे. चार्जिंगसाठी पुरेसी यंत्रणा नसल्यामुळे ई-वाहन विक्रीवर परिणाम हाेऊ शकताे, असे त्यात म्हटले आहे.

भारतात गेल्या वर्षी लाखांहून अधिक ई-वाहनांची विक्री झाली. त्यामुळे क्षेत्रात झपाट्याने वाढ हाेणार असल्याचे बाेलले जात आहे. ई-वाहनांच्या विक्रीत वाढ विविध राज्य सरकारांनी जाहीर केलेली धाेरणे आणि त्याद्वारे दिलेल्या सवलती, प्रमुख कारण हाेते. मात्र, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश ई-वाहनांची विक्री, चार्जिंगसाठी पायाभूत सुविधांची उभारणी, तसेच गुंतवणुकीचे लक्ष्य पूर्ण करण्याच्या मार्गावर नसल्याचे दिसून आले आहे. 

राज्यांचे ई-वाहन धाेरण आणि अभ्यास करण्यात आला. राज्यांचे लक्ष्य, मागणी, तरतूद, राेजगार निर्मिती, सुविधांची उभारणी आदींच्या आधारे आढावा घेण्यात आला.

सर्वाधिक ई-वाहने असलेली राज्येराज्य     दुचाकी     तीनचाकी     इतरउत्तर प्रदेश     ४३,०३६     ४,०६,००१     १,५१५महाराष्ट्र     १,८०,७९६     १३,३२९     १९,८७०दिल्ली     ५१,५४९     १,३५,५९९     ११,००१कर्नाटक     १,५१,९५६     ८,०१३     १३,३८६राजस्थान     ८१,१५०     ५३,३९७     २,५३०

असे मागे पडले लक्ष्य४-६ हजार ई-बस खरेदीपर्यंत करण्याचे लक्ष्य अनेक राज्यांचे आहे.१०० प्रत्यक्षात खरेदी झाली आहे.२५ हजार चार्जिंग स्टेशन्स उभारणार आहेत पर्यंत४०० स्टेशन्स सरासरी सुरू करण्यात आली आहेत.

टॅग्स :इलेक्ट्रिक कार / स्कूटर