- चंद्रकांत कित्तुरे
कोल्हापूर : देशातील साखर कारखान्यांना खुल्या बाजारात विक्रीसाठी आॅगस्ट महिन्यात १७ लाख ५० हजार क्विंटल साखरेचा कोटा केंद्र सरकारने निश्चित केला आहे. त्याचबरोबर आतापर्यंत चार लाख क्विंटल साखर निर्यात झाली आहे. या निर्यातीच्या बदल्यात दोन लाख टन अतिरिक्त साखर देशांतर्गत बाजारपेठेत विकण्याला संबंधित कारखान्यांना परवानगी देण्यात आली आहे. यामुळे आॅगस्टमध्ये १९ लाख ५० हजार टन साखर उपलब्ध असणार आहे.
श्रावणात सणासुदीचा हंगाम सुरू होत आहे.२२ आॅगस्टला बकरी ईद आहे. दक्षिण भारतात २४ आॅगस्टला ओणम साजरा होत आहे. त्याचप्रमाणे दि. २६ रोजी नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन आहे. याशिवाय ३ सप्टेंबरला गोकुळाष्टमी आहे. या सणांमुळे साखरेच्या मागणीत होणारी वाढ लक्षात घेऊन केंद्राने १९.५० लाख टन साखर खुल्या बाजारात आणण्याला परवानगी दिली आहे. जुलैसाठी हाच कोटा १६ लाख ५० हजार क्विंटल, तर जूनमध्ये २१ लाख क्विंटल साखर खुल्या बाजारात विकण्यास अनुमती दिली होती. गत महिन्याच्या तुलनेत आॅगस्टसाठीचा कोटा १८ टक्क्यांनी जादा आहे.
निर्यातीचे लक्ष्य
गाठणे अशक्य
अतिरिक्त साखर उत्पादनामुळे २० लाख टन साखर निर्यातीला केंद्र सरकारने परवानगी दिली होती. त्यासाठी कारखान्यांना निर्यात कोटाही ठरवून दिला होता. मात्र, जागतिक बाजारपेठेतही साखरेचे दर कोसळले असल्याने अपेक्षित साखर निर्यात करणे शक्य नसल्याचे कारखान्यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर साखर निर्यात करणाऱ्या कारखान्यांना ऊस पाठविणाºया शेतकºयांच्या खात्यावर प्रतिटन ५५ रुपये अनुदान देण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे.
आॅगस्टसाठी देशात १९.५० लाख क्विंटल साखर, निर्यातीचे लक्ष्य गाठणे अशक्य
देशातील साखर कारखान्यांना खुल्या बाजारात विक्रीसाठी आॅगस्ट महिन्यात १७ लाख ५० हजार क्विंटल साखरेचा कोटा केंद्र सरकारने निश्चित केला आहे. त्याचबरोबर आतापर्यंत चार लाख क्विंटल साखर निर्यात झाली आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 12:50 AM2018-08-01T00:50:26+5:302018-08-01T00:50:47+5:30