Lokmat Money > बिझनेस न्यूज > देशाला SBIसारख्या ४ ते ५ मोठ्या बँकांची गरज, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं मोठं विधान 

देशाला SBIसारख्या ४ ते ५ मोठ्या बँकांची गरज, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं मोठं विधान 

Banking News: केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, भारताला अर्थव्यवस्था आणि उद्योगांच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियासारख्या ४ ते ५ बँकांची गरज आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 09:26 PM2021-09-26T21:26:13+5:302021-09-26T22:51:02+5:30

Banking News: केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, भारताला अर्थव्यवस्था आणि उद्योगांच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियासारख्या ४ ते ५ बँकांची गरज आहे.

The country needs 4 to 5 big banks like SBI, says Finance Minister Nirmala Sitharaman | देशाला SBIसारख्या ४ ते ५ मोठ्या बँकांची गरज, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं मोठं विधान 

देशाला SBIसारख्या ४ ते ५ मोठ्या बँकांची गरज, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं मोठं विधान 

नवी दिल्ली - केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, भारताला अर्थव्यवस्था आणि उद्योगांच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियासारख्या ४ ते ५ बँकांची गरज आहे. त्यांनी भारतीय बँक संघ (आयबीए)च्या ७४ व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीमध्ये सांगितले की. भारतीय बँकिंग तत्काळ आणि दीर्घकाळामध्ये कसे असले पाहिजे, याबाबत बँकिंग उद्योगाने विचार केला पाहिजे. त्या पुढे म्हणाल्या की, दीर्घकालीन भविष्याबाबत विचार करायचा झाल्यास हे क्षेत्र आता बऱ्यापैकी डिजिटल प्रक्रियांच्या माध्यमातून संचालित होणार आहे. (The country needs 4 to 5 big banks like SBI, says Finance Minister Nirmala Sitharaman)

अर्थमंत्री सीतारामन यांनी सांगितले की, भारतीय बँकिंग उद्योगांच्या टिकाऊ भविष्यासाठी इंटर कनेक्टेड डिजिटल सिस्टिमची गरज आहे. त्यांनी सांगितले की, भविष्यातील आव्हानाचा विचार करता आम्हाला अधिक संख्येमध्ये बँकांची गरज नाही तर मोठ्या बँकांची गरज आहे. भारताला एसबीआयच्या आकाराच्या किमान चार मोठ्या बँकांची गरज आहे. आम्हाला वाढत्या आणि बदलत्या गजरांची पूर्तता करण्यासाठी बँकिंगला प्रोत्साहन दिले पाहिजे. कोरोनाच्या साथीपूर्वीसुद्धा याबाबत विचार करण्यात आला होता. आता भारतामध्ये आम्हाला ४ किंवा ५ एसबीआयची गरज असेल.

यावेळी यूपीआयला मजबूत करण्यावरही अर्थमंत्र्यांनी भर दिला. त्या म्हणाल्या की, आज डिजिटल पेमेंटच्या जगात भारतीय यूपीआयने खूप मोठा प्रभाव पाडला आहे. आमचे रुपे कार्ड विदेशी कार्डप्रमाणे ग्लॅमरस नव्हते. मात्र आता जगातील अनेक भागात आता ते स्वीकारले जात आहे. हे भारताच्या भविष्यातील डिजिटल पेमेंटमधील इराद्यांचे उदाहरण आहे. यावेळी सीतारामन यांनी बँकर्सना यूपीआयला महत्त्व देण्याचे आणि त्याला मजबूत करण्याचे आवाहन केले.

यावेळी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सांगितले की, उच्च आर्थिक व्यवहार आणि वित्तीय समावेशनावर भद दिल्यानंतरही देशातील अनेक जिल्ह्यांमध्ये बँकांचे अस्तित्व नाही आहे. अशा जिल्ह्यांमध्ये सर्व सुविधा असलेल्या शाखा उघडण्याचे आवाहन वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावेळी केले. तसेच आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात होत असलेल्या भागातही बँका नसल्याबद्दल निर्मला सीतारामन यांनी आश्चर्य व्यक्त केले. 

Web Title: The country needs 4 to 5 big banks like SBI, says Finance Minister Nirmala Sitharaman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.