कोच्ची : देशात मसाल्याची वाढती मागणी लक्षात घेऊन केंद्रीय वाणिज्यमंत्री निर्मला सीतारमन यांनी मसाला बाजार विकसित करण्याची गरज प्रतिपादित केली. मसाला बाजाराची सर्वांना आवश्यकता असते.मसाल्याचा सर्वांत मोठा बाजार भारतातच वाढत असल्याचा दावा मसाला मंडळाने केला आहे. या पार्श्वभूमीवर आम्हाला निर्यात वाढविण्याची गरज आहे. मात्र, भारतात बाजार वाढत आहे. माझ्या मते, यावरील पकड मजबूत करणे आवश्यक असल्याचे वाणिज्यमंत्री म्हणाल्या. मसाला मंडळाद्वारे आयोजित एका समारंभाला त्या संबोधित करीत होत्या. यावेळी त्यांनी एका मसाला संवर्धन कार्यक्रमाचे उद्घाटन केले.वाणिज्यमंत्री म्हणाल्या, अतिरिक्त मसाल्यापैकी भारताची गरज पूर्ण केल्यानंतर शिल्लक मसाल्याकरिता नवीन बाजारपेठ शोधणे आवश्यक आहे. वाणिज्य मंत्रालय देशात काळी मिर्ची उत्पादकांसमोरील समस्यांचा गांभीर्याने विचार करेल, असे आश्वासन सीतारमन यांनी दिले. काळ्या मिर्चीची आयात वाढल्यास याचे उत्पादक अडचणीत येण्याची भीती आहे.देशात विशेषत: ईशान्येत मसाल्यांच्या संवर्धनासाठी सर्वंकष धोरण अवलंबण्याची गरज आहे. (वृत्तसंस्था)
देशात मसाला बाजार विकसित करणे गरजेचे
By admin | Published: September 27, 2014 7:07 AM