कोटा : सर्व भारतीयांना लवकरच नवा चहा प्यावयास मिळणार आहे. या चहाची लज्जत न्यारी आहे. राजस्थानच्या प्रयत्नांमुळे या चहाच्या घोटामुळे तरतरी मिळेल. ‘आॅलिटिया’असे या चहाचे नाव आहे.
मोठे वाळवंट असलेल्या राजस्थानने इस्त्राएलच्या सहकार्याने २००७ मध्ये आॅलिव्ह वृक्षांची लागवड सुरू केली. राज्यातील ५ हजार हेक्टरमध्ये आॅलिव्हची लागवड केली जाते. देशांतील पहिली आॅलिव्ह रिफायनरी बिकानेरला सुरु करण्यात आली. आम्ही
आॅलिव्ह मधाचे उत्पादनही सुरू केले आहे. मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या हस्ते लवकर हा चहा बाजारात आणण्यात येणार आहे, असे राजस्थानचे कृषिमंत्री प्रभू लाल सैनी यांनी सांगितले.
‘आॅलिव्ह ग्रीन टी’चे उत्पादन करण्याची कल्पना कशी सुचली? असे विचारता सैनी म्हणाले की, मी कृषि विषयात पीएच. डी केली आहे. आॅलिव्हचा पाने आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत लाभकारी आहे, हे मला ठाऊक होते. त्यावर आणखी संशोधन करण्याचा ठरविले.
प्रयोगशाळेत चाचण्याही घेतल्या. जुलैतील चाचणीत आॅलिव्हच्या पानांत प्रतिआॅक्सिडीकारण (अॅन्टी-आॅक्सिडंंट), शोथरोधी (अॅन्टी-इन्फ्लॅमेटरी) आणि इतर आरोग्यदायी घटक असल्याचे निष्पन्न झाले.
या पानांमध्ये लुटेओलिन हा घटकपदार्थही आढळला. त्यावर प्रयोग केल्यानंतर असे दिसून आले की, हा पदार्थ दाहक जीवांणूवर मात करतो. तसेच आॅक्सिजन अपमार्जकही आहे. ब्लड , प्रोस्टेट आणि गर्भाशय कॅन्सरपासून बचाव करण्यासही पूरक आहे. मानसिक तणाव आणि
हृदय रूग्णांसाठी लाभदायी आहे.
ही गुणतत्त्वे कळल्यानंतर आम्ही प्रक्रिया करण्याचे ठरविलेण असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)
अनेक देशांची मागणी
‘आॅलिव्ह टी’च्या पॅकेटवर यात कॅफेनचा जराही अंश नसल्याचे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. अनेक स्वादात आॅलिव्ह टी आणला जाणार आहे. आले, तुळशी आदी स्वादातही या चहाचे उत्पादन करण्याचा मानस आहे. ब्रिटन, अमेरिका आणि आखातासह अनेक देशांकडून प्रस्ताव आले असून या देशांचा करार करण्याचा मानस आहे, असे त्यांनी सांगितले.
देशवासीयांना मिळणार ‘आॅलिटिया’ चहा, अनेक देशांची मागणी
सर्व भारतीयांना लवकरच नवा चहा प्यावयास मिळणार आहे. या चहाची लज्जत न्यारी आहे. राजस्थानच्या प्रयत्नांमुळे या चहाच्या घोटामुळे तरतरी मिळेल. ‘आॅलिटिया’असे या चहाचे नाव आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 01:42 AM2017-08-26T01:42:55+5:302017-08-26T01:43:29+5:30