मुंबई : रुपयाने घेतलेली नीचांकी डुबकी, आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमतींनी चार वर्षांतील गाठलेला उच्चांक, देशाच्या चालू खात्यावरील वाढती तूट आणि महागाईचा आणखी भडका होण्याची भीती अशा विविध कारणांनी शेअर बाजारावर अस्वलाचे (मंदीवाल्यांचे) साम्राज्य निर्माण झाले असून, त्याचा फटका गुरुवारी मोठ्या प्रमाणात बसला. मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ८०६.४७ अंशांनी कोसळला. एकूण ३०४ आस्थापनांच्या समभागांचे व्यवहार थांबवावे लागले. यावरून बाजारातील मंदीची कल्पना येते.
गेल्या महिनाभरापासून बाजारावर मंदीचे मळभ दाटले आहे. बाजारातील व्यवहारांची संख्या घटली आहे. परकीय वित्तसंस्थांकडून बाजारातून रक्कम काढून घेतली जात आहे. खनिज तेलाच्या वाढत्या किमती आणि घसरणारा रुपया यामुळे बाजारात अस्थिरता आहे. सोमवारपासून बाजार सातत्याने खाली येत आहे. गुरुवारी डॉलरच्या तुलनेत रुपयाने ७३.८१ अशी सर्वाधिक नीचांकी डुबकी घेतली. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचा दर पिंपाला ८६ डॉलर असा झाला. रुपयाच्या घसरणीमुळे आयात महाग होणार असून, निर्यात स्वस्त होणार आहे, परिणामी आयात-निर्यात व्यापाराचा समतोल बिघडेल. यामुळे देशाच्या चालू खात्यावरील तूट मोठ्या प्रमाणावर वाढून अर्थसंकल्पीय तूट वाढण्याची दाट भीती आहे.२००८मध्ये ६ वेळा विक्रमी घसरणगुरुवारी बाजारात झालेली घसरण ही आतापर्यंतची १३व्या क्रमांकांची मोठी घसरण आहे. २४ आॅगस्ट २०१५ रोजी संवेदनशील निर्देशांक १६२४.५१ अंशानी घसरला ही आतापर्यंतची एका दिवसातील सर्वाधिक घसरण होती.२००८मध्ये २१ जानेवारीला १४०८.३५ अंश तर २४ आॅक्टोबरला १०७०.६३ अंश अशा विक्रमी घसरणी नोंदविल्या गेल्या. या वर्षात सहावेळा बाजारात ८०० अंशापेक्षा जास्त घसरण झाली. चालू वर्षातील सर्वाधिक घसरण२ फेब्रुवारी २०१८ रोजी ८३९.९१ अंशाची नोंदविली गेली आहे.१९१४ आस्थापनांच्या शेअर्समध्ये घसरणच्गुरुवारी बाजारात एकूण २८०२ आस्थापनांच्या समभागांचे व्यवहार झाले. यात ७५३ आस्थापनांचे दर वाढले, तर १३८ आस्थापनांचे दर कायम राहिले.च्१९१४ आस्थापनांच्या समभागांचे दर मात्र घसरले. एकूण ३०४ आस्थापनांचे शेअर्स १० टक्केपेक्षा जास्त घटल्याने त्यांचे व्यवहार थांबवावे लागले.