Lokmat Money > बिझनेस न्यूज > देशाचा वृद्धिदर होणार पुढील वर्षी दोन अंकी

देशाचा वृद्धिदर होणार पुढील वर्षी दोन अंकी

पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीचा अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:23 AM2021-03-13T05:23:23+5:302021-03-13T05:24:06+5:30

पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीचा अहवाल

The country's growth rate will be double-digit next year | देशाचा वृद्धिदर होणार पुढील वर्षी दोन अंकी

देशाचा वृद्धिदर होणार पुढील वर्षी दोन अंकी

Highlightsपीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय अगरवाल यांनी सांगितले की, २०२०-२१ वित्त वर्षाच्या पहिल्या तिमाहीत २४.४ टक्के, तर दुसऱ्या तिमाहीत  ७.३ टक्के अशी जीडीपीची घसरण झाली होती

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : सध्याची आर्थिक घडामोडींची गती पाहता वित्त वर्ष २०२२ मध्ये भारताच्या जीडीपीचा वृद्धिदर दोन अंकी होईल, तसेच तो ११ टक्क्यांपेक्षाही अधिक राहील, असा अंदाज पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीजने व्यक्त केला आहे. 

पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय अगरवाल यांनी सांगितले की, २०२०-२१ वित्त वर्षाच्या पहिल्या तिमाहीत २४.४ टक्के, तर दुसऱ्या तिमाहीत  ७.३ टक्के अशी जीडीपीची घसरण झाली होती. तिसऱ्या तिमाहीत मात्र झटपट सुधारणा होऊन जीडीपीचा वृद्धिदर ०.४ टक्क्यांवर आला. सरकारने केलेल्या उपाययाेजनांमुळे गुंतवणूकदारांची धारणा मजबूत झाली आहे. २०२१-२२ या वित्त वर्षात त्याचा लाभ होईल. या वर्षात वृद्धिदर ११ टक्के राहील, असा २०२०-२१च्या आर्थिक सर्वेक्षणातील अंदाज आहे. वित्त वर्ष २०२०-२१ च्या       एप्रिल-फेब्रुवारी या तिमाहीत इंडेक्स ९२.४वर होता. तत्पूर्वी २०१९-२०च्या एप्रिल-फेब्रुवारी तिमाहीत तो ९९.५ वर होता. 

आर्थिक घडामोडींना गती
मागील ११ महिन्यांत सरकारने व्यापक उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे देशातील आर्थिक घडामोडींना मोठी गती मिळाली आहे. पीएचडीसीआय इकॉनॉमी जीपीएस इंडेक्स फेब्रुवारी २०२०मध्ये १०३वर होता. फेब्रुवारी २०२१पर्यंत त्यात १९ अंकांची सुधारणा झाली आहे. अर्थव्यवस्था झपाट्याने सुधारत असल्याचे संकेत इंडेक्सद्वारे मिळत आहेत. लवकरच तो फेब्रुवारी २०२० पातळीवर जाईल, असा अंदाज आहे. 

Web Title: The country's growth rate will be double-digit next year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.