नवी दिल्ली: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस नवीन उच्चांक गाठत असून, कोरोनाच्या मृत्यूचे प्रमाणही वाढताना पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, कोरोना लस यांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्येही वाढ होताना दिसत असून, आता केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने दिलासादायक निर्णय घेतला आहे. आता, कोव्हिड रुग्णालये, नर्सिंग होम्स आणि कोव्हिड सेंटर्ससह यांना ठराविक कालावधीसाठी २ लाखांवरील बिले रोखीने घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. (covid hospitals are allows to receiving cash payments of more than 2 lakh from corona patients)
दोन लाखांवरील व्यवहारांवर सरकारने बंदी घातलेली असली तरी आता केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार, कोरोना काळात कोरोना रुग्णांना सेवा देणारी रुग्णालये, मेडिकल्स, नर्सिंग होम्स, कोरोना केअर सेंटर्स आणि कोरोना रुग्णांना सेवा देणाऱ्या इतर समकक्ष संस्थांना दोन लाखांवरील व्यवहार करण्यास मूभा देण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिसूचना काढण्यात आली आहे.
The exemption is for Hospitals, Dispensaries, Nursing Home, Covid Care Centres or similar other medical facilities providing treatment to Covid patients, for receiving cash exceeding Rs 2 Lakhs
— ANI (@ANI) May 7, 2021
“निवडणुकानंतर पंतप्रधान मोदींचा ‘तेल का दाम बढाओ’ कार्यक्रम सुरू”
आधार वा पॅन कार्ड गरजेचे
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या रोखीने व्यवहार करण्याच्या मुभेसाठी रुग्णांचे नाव आणि बिल देणाऱ्या व्यक्तीचे आधार वा पॅन कार्ड यांची माहिती आणि त्यांच्यातील नातेसंबंध याची माहिती द्यावी लागणार आहे. १ एप्रिल ते ३१ मे या कालावधीतच असे व्यवहार करण्यास मूभा देण्यात आली आहे. प्राप्तीकर कायदा अधिनियम २६९एसी नुसार दोन लाख रुपयांच्या पुढे रोखीने व्यवहार करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. परंतु, दोन महिन्यांच्या कालावधीसाठी कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांना यातून मूभा देण्यात आली आहे. याचा फायदा कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णालयांना होईल, असे सांगितले जात आहे.