Join us

वाहनचालक परवान्यांचा डाटा बेस तयार करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2018 4:54 AM

एकाच व्यक्तीला वाहन चालविण्याचे अनेक परवाने देण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकार राष्ट्रीय पातळीवर डाटा बेस तयार करीत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी केले.

नवी दिल्ली : एकाच व्यक्तीला वाहन चालविण्याचे अनेक परवाने देण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकार राष्ट्रीय पातळीवर डाटा बेस तयार करीत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी केले.रस्ते सुरक्षा जनजागरण कार्यक्रमात गडकरी म्हणाले की, भारतातील सध्याच्या व्यवस्थेत वाहन चालविण्याचा परवाना काढणे ही अत्यंत सोपी बाब आहे. एकाच व्यक्तीला अनेक राज्यांमधून एकापेक्षा अधिक वाहन चालविण्याचे परवाने मिळतात. हे प्रकार रोखण्यास आम्ही वाहन चालविण्याच्या परवान्यांचा स्वतंत्र डाटा बेस तयार करीत आहोत.गडकरी म्हणाले की, कोणत्याही चाचणीशिवाय परवाने वितरित होत असतात. त्यामुळेही अनेक अपघात होतात. याला आळा घालण्यासाठी अनेक ठिकाणी चालक प्रशिक्षण केंद्रांची स्थापना करण्यात येईल. सध्या देशात २२ लाख चालकांची टंचाई आहे. त्यामुळे चालकविरहित गाड्यांना परवानगी दिली जाणार नाही. आम्ही आता स्वस्त गाड्यांनाही एअरबॅग सक्तीच्या केल्या आहेत.>अपघात टाळण्यासाठी उपाययोजनागडकरी म्हणाले की, जगातील सर्वाधिक रस्ते अपघात भारतात होतात, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. दरवर्षी १.५ लाख लोक अपघातात मरण पावतात. अपघातांना आळा घालण्यासाठी काही उपाययोजना सरकारने हाती घेतल्या आहेत. रस्ते अभियांत्रिकीत सुधारणा करणे, चालकांना योग्य प्रशिक्षण देणे, वाहनांचे डिझाइन अधिक सुरक्षित करणे आणि अपघातग्रस्त भाग शोधणे यांचा त्यात समावेश आहे.

टॅग्स :अपघात