मुंबई : हवाई दलाची ताकद असलेल्या ‘सुखोई ३० एमकेआय’ विमानांची निर्मिती आणखी तीनच वर्षे चालणार आहे. नाशिकजवळील ओझर येथील कारखान्यात नंतर केवळ विमानांच्या दुरुस्तीचे काम चालेल, अशी माहिती हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडचे (एचएएल) प्रभारी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक व्ही. एम. चमोला यांनी दिली.एचएएल ही संरक्षण मंत्रालयांतर्गत काम करणारी सर्वांत जुनी कंपनी आहे. कंपनीतील १० टक्के भागीदारीची सरकार निर्गुंतवणूक करीत आहे. यानिमित्ताने कंपनीच्या अधिकाऱ्यांनी योजनांची माहिती दिली. नाशिकच्या कारखान्यात सुखोई निर्मितीसाठी रशियाकडून तंत्रज्ञानाचे पूर्ण हस्तांतरण झाले आहे. यामुळे विमानाचा प्रत्येक भाग आता एचएएलच तयार करते, असे चमोला यांनी सांगितले.हवाई दलाला २७२ सुखोई विमाने हवी होती. त्यापैकी २४० सुखोर्इंची निर्मिती आधीच झाली आहे. आता नाशिकला केवळ ३२ सुखोर्इंची निर्मिती होईल. निर्मितीचे हे काम कारखान्यात २०२०पर्यंत चालणार आहे. त्यानंतर कारखान्यात विमानांची देखभाल व दुरुस्ती होईल. सुखोईला १५ हजार तासांच्या उड्डाणानंतर दुरुस्तीची गरज असते. सध्या वर्षाला चार ते सहा विमानांची दुरुस्ती होत असून ही क्षमता पुढे वाढविली जाईल, असे कंपनीचे संचालक एम. मझर अली म्हणाले.>कर्मचाºयांसाठी १.९६ टक्के शेअर्सनिर्गुंतवणुकीसाठी एचएएलने ३ कोटी ४१ लाख ०७ हजार ५२५ शेअर्स विक्रीस काढले आहेत. त्यातून कंपनी सुमारे ४००० कोटी रुपये उभे करेल. त्यातील १.९६ टक्के अर्थात ६.६८ लाख शेअर्स हे ३२,८०० कर्मचाºयांसाठी राखीव आहेत. किरकोळ गुंतवणूकदारांना कंपनीने २५ रुपये प्रति शेअर सवलत देऊ केली आहे. शेअरचा दर १२१५ ते १२४० रुपये आहे.>‘तेजस’च्या क्षमतावाढीला मान्यता‘एलसीए तेजस’ लढाऊ विमानाची निर्मिती जोमाने सुरू आहे. एकूण ४0पैकी ७ विमाने हवाई दलाला दिली आहेत. वर्षाला ८ विमाननिर्मितीची असलेली ही क्षमता १६वर नेण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे.
‘सुखोई’ची निर्मिती फक्त तीनच वर्षे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 1:16 AM