नवी दिल्ली - क्रेडिट कार्डचा वापर बदलत्या काळासोबत वाढत आहे. क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्याने खूप सवलती मिळतात. तसेच क्रेडिट कार्डच्या वापरामुळे खूप रिवॉर्ड्सही मिळतात. या रिवॉर्ड्समुळेही खूप फायदा होतो. या रिवॉर्ड्समध्ये कॅशबॅक, सवलती आमदींचा समावेश असतो. तसेच अनेकजण यूपीआयच्या माध्यमातूनही पेमेंट करणे पसंद करतात. मात्र आता क्रेडिट कार्ड आणि यूपीआय दोन्हीमधून युझर्सना फायदा होतो.
क्रेडिट कार्डधारक लवकरच युनायटेड पेमेंट इंटरफेस (UPI) च्या माध्यमातून वस्तू आणि सेवांचा भरणा करण्यास सक्षम असतील. सध्या यूपीआयचा वापर करणाऱ्यांना केवळ त्यांच्या बँक खात्याच्या माध्यमातूनच व्यवहार करण्याची परवानगी होती. क्रेडिट कार्डच्या माध्यमातून यूपीआय पेमेंट केवळ Razorpay Payments Gateway चा वापर करणाऱ्या व्यापाऱ्यांनाच करता येईल. त्यामुळे त्यांचा प्लॅटफॉर्म यूपीआयवर क्रेडिट कार्ड व्यवहारांना सक्षम करेल. Razorpay ने सांगितले की हा एनसीपीआय सुविधेचा अवलंब करणारा पेमेंट गेटवे आहे. जो ग्राहकांना त्यांच्या त्यांच्या रुपे क्रेडिट कार्डला यूपीआयसोबत परवानगी देते. Razorpay ने सांगितले की, एनसीपीआय आणि आरबीआयच्या डिजिटल स्पेसमध्ये नाविन्यपूर्ण इनोव्हेशनला अनुरूप अशी ही सुविधा आहे.