Lokmat Money > बिझनेस न्यूज > क्रेडिट कार्डची ड्यू डेट निघून गेल्यास काळजी करण्याची गरज नाही, कारण...

क्रेडिट कार्डची ड्यू डेट निघून गेल्यास काळजी करण्याची गरज नाही, कारण...

credit card : जर तुम्ही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरत असाल आणि अनेकदा देय तारखेपर्यंत पैसे भरायला विसरलात तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2022 04:58 PM2022-12-11T16:58:13+5:302022-12-11T16:59:58+5:30

credit card : जर तुम्ही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरत असाल आणि अनेकदा देय तारखेपर्यंत पैसे भरायला विसरलात तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही.

credit card companies cannot fine till 3 days after due date says rbi | क्रेडिट कार्डची ड्यू डेट निघून गेल्यास काळजी करण्याची गरज नाही, कारण...

क्रेडिट कार्डची ड्यू डेट निघून गेल्यास काळजी करण्याची गरज नाही, कारण...

नवी दिल्ली : एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरणारे लोक अनेकदा देय तारखेपर्यंत (ड्यू डेट) पैसे देण्यास विसरतात किंवा त्यांच्यासाठी क्रेडिट कार्ड मॅनेज करणे कठीण होते. अशा स्थितीत प्रत्येक वेळी कोणत्या कार्डाची देय तारीख कधी आली, हे त्यांना आठवत नाही. यामुळे त्यांना दंड भरावा लागतो. जर तुम्ही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरत असाल आणि अनेकदा देय तारखेपर्यंत पैसे भरायला विसरलात तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही.

दरम्यान, आरबीआयच्या आदेशानुसार देय तारखेनंतर 3 दिवसांपर्यंत बँक तुमच्यावर दंड आकारू शकत नाही. जर तुमची देय तारीख 15 डिसेंबर असेल तर तुम्हाला 18 तारखेपर्यंत कोणताही दंड आकारला जाणार नाही. आरबीआयने क्रेडिट कार्ड ग्राहकांना बिल भरण्यासाठी अतिरिक्त 3 दिवसांची मुदत दिली आहे. आरबीआयने 21 एप्रिल 2022 रोजी या संदर्भात आदेश जारी केला होता. आता जर तुम्ही देय तारखेच्या 3 दिवसांनंतरही पेमेंट भरले तर तुमच्या क्रेडिट स्कोअरमध्ये कोणताही फरक पडणार नाही.

क्रेडिट कार्डचे बिलिंग सायकल
क्रेडिट कार्डधारक क्रेडिट कार्डचे बिलिंग सायकल स्वतःच्या इच्छेनुसार ठरवतो. मात्र, ते किती दिवसांसाठी असेल ते बँक ठरवते. म्हणजे ही बिलिंग सायकल 27 दिवसांची असेल की 31 दिवसांची ही बँक तुम्हाला सांगेल. त्यानुसार तुम्ही तुमचे मासिक चक्र सेट करू शकता. तुमच्या 2 बिलिंग स्टेटमेंट्समधील कालावधीला बिलिंग सायकल म्हणतात. समजा, तुमचे क्रेडिट कार्ड स्टेटमेंट 28 नोव्हेंबर रोजी तयार झाले आहे. म्हणजेच तुमचे नवीन बिलिंग सायकल 29 तारखेपासून सुरू होईल. आता देय तारीख 28 तारखेनंतर 15 दिवस असणार आहे. म्हणजेच, बँक तुम्हाला पेमेंटसाठी अतिरिक्त 15 दिवस देते. तसेच, आता आरबीआयच्या आदेशानंतर, तुम्हाला आणखी 3 दिवस मिळतील.

पेमेंट वेळेवर न केल्यास काय होईल?
जर तुम्ही क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरले नाही तर त्याचा तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होतो. तुमचा क्रेडिट स्कोअर कमी होईल, ज्यामुळे तुम्हाला कर्ज घेणे किंवा भविष्यात पुन्हा क्रेडिट कार्ड मिळवणे कठीण होईल. दुसरीकडे, तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड बिल वेळेवर भरल्यास, तुम्हाला कर्ज सहज आणि परवडणाऱ्या दरात मिळेल.

Web Title: credit card companies cannot fine till 3 days after due date says rbi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.