नवी दिल्ली : सध्या बहुतांश लोक क्रेडिट कार्ड वापरतात. पेमेंटसाठी क्रेडिट कार्ड वापरण्याचे अनेक फायदे आहेत. यामध्ये, तुम्हाला अनेक प्रकारच्या ऑफर, डिस्काउंट आणि रिपेमेंटसाठी 50 दिवस व्याजाशिवाय मिळतो. क्रेडिट कार्डच्या मदतीने तुम्ही बिले सहज भरू शकता आणि ऑनलाइन शॉपिंगसाठी पेमेंट करू शकता.
क्रेडिट कार्डचे अनेक फायदे पाहता अनेक लोक एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड ठेवतात. दरम्यान, क्रेडिट कार्डचे जितके फायदे आहेत तितकेच काही तोटेही आहेत. अशा परिस्थितीत तुमच्यासाठी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की तुमच्याकडे एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असावेत की नाही? याबाबत जाणून घ्या...
तुमची आर्थिक मॅनेज करण्यासाठी तुम्हाला क्रेडिट कार्डची आवश्यकता असल्यास, तुम्ही क्रेडिट कार्ड घेऊ शकता. क्रेडिट कार्ड मॅनेज करण्यासाठी तुम्हाला जास्त प्रयत्न करावे लागत नाहीत. तुम्ही त्याचे बिल वेळेवर सहज रिपेमेंट करू शकता. वेळेवर बिले भरून तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारू शकता. नवीन क्रेडिट कार्ड युजर्ससाठी, फक्त एक क्रेडिट कार्ड असणे चांगले आहे, असे म्हटले आहे.
एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असण्याचे फायदेसर्व क्रेडिट कार्डमध्ये वेगवेगळी फीचर्स आणि फायदे आहेत. उदाहरणार्थ, काही क्रेडिट कार्ड युजर्संना फक्त प्रवासाशी संबंधित सूट देतात. तसेच, काही क्रेडिट कार्ड केवळ ऑनलाइन खरेदी आणि इंधनावर सूट देतात. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला या सर्व ऑफर्सचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड ठेवू शकता. पण, त्याचे बिल वेळेवर भरले पाहिजे, हे लक्षात ठेवा. क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरले नाही, तर तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होऊ शकतो.
दुसरे क्रेडिट कधी घेतले पाहिजे?दुसरे क्रेडिट कार्ड घेण्यापूर्वी तुम्हाला तुमचे दैनंदिन खर्च आणि जीवनशैली समजून घेणे आवश्यक आहे, ज्यावर तुम्ही जास्त खर्च करता. मग त्यानुसार तुम्ही ब्रँडेड क्रेडिट कार्ड घ्यावे. उदाहरणार्थ, जर तुम्ही फ्लाइटमध्ये खूप प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एअर माइल्स क्रेडिट कार्ड घेणे अधिक चांगले होईल. दुसरीकडे, जर तुम्ही खूप शॉपिंग करत असाल तर तुमच्यासाठी शॉपिंग क्रेडिट कार्ड घेणे चांगले होईल.