जुलै महिन्यात देशातील अनेक बँकांनी आपल्या क्रेडिट कार्डशी संबंधित नियमांमध्ये बदल केले आहेत. या बँकांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि सिटी बँक क्रेडिट कार्ड यांचा समावेश आहे. हे नवे नियम १ जुलै २०२४ पासून लागू होतील. जाणून घेऊयात कोणते बदल करण्यात आले आहेत.
स्टेट बँक ऑफ इंडियानं आपल्या कोट्यवधी ग्राहकांना, १ जुलै २०२४ पासून काही क्रेडिट कार्डवर सरकारी व्यवहारांवर रिवॉर्ड पॉईंट मिळणं बंद यासंदर्भात माहिती दिली आहे. पाहा कोणत्या कार्डचा यात आहे समावेश.
एअर इंडिया एसबीआय प्लॅटिनम कार्ड
एअर इंडिया एसबीआय सिग्नेचर कार्ड
सेंट्रल एसबीआय सिलेक्ट+ कार्ड
चेन्नई मेट्रो एसबीआय कार्ड
क्लब विस्तारा एसबीआय कार्ड
क्लब विस्तारा एसबीआय कार्ड प्राईम
दिल्ली मेट्रो एसबीआय कार्ड
एतिहाद गेस्ट एसबीआय कार्ड
एतिहाद गेस्ट एसबीआय प्रीमियर कार्ड
फॅबइंडिया एसबीआय कार्ड
फॅबइंडिया एसबीआय कार्ड सिलेक्ट
आयआरसीटीसी एसबीआय कार्ड
आयआरसीटीसी एसबीआय कार्ड प्रीमियर
मुंबई मेट्रो एसबीआय कार्ड
नेचर बास्केट एसबीआय कार्ड
नेचर बास्केट एसबीआय कार्ड एलिट
ओला मनी एसबीआय कार्ड
पेटीएम एसबीआय कार्ड
रिलायन्स एसबीआय कार्ड
रिलायन्स एसबीआय कार्ड प्राईम
एसबीआय ट्रॅव्हल कार्ड
ICICI बँक क्रेडिट कार्ड
आयसीआयसीआय बँकेनं १ जुलै २०२४ पासून लागू होणाऱ्या क्रेडिट कार्डच्या अनेक नियमांमध्ये बदल केले आहेत. यामध्ये एमराल्ड प्रायव्हेट मेटल क्रेडिट कार्ड वगळता सर्व कार्डवरील कार्ड रिप्लेसमेंट फी १०० रुपयांवरून २०० रुपये करण्यात आली आहे.
सिटी बँक क्रेडिट कार्ड
अॅक्सिस बँकेने सिटी बँक क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना क्रेडिट कार्ड खात्यांसह सर्व प्रकारच्या मायग्रेशनची माहिती दिली आहे. ही प्रक्रिया १५ जुलै २०२४ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. अॅक्सिस बँकेनं सिटी बँक क्रेडिट कार्ड ग्राहकांना पाठवलेल्या ईमेलमध्ये, कार्डसह सर्व मायग्रेशन १५ जुलै २०२४ पर्यंत पूर्ण केलं जाणार असल्याचं म्हटलंय. मायग्रेशननंतर (वर्षाच्या अखेरीस) सिटी-ब्रँडेड कार्ड ग्राहकांना त्यांचे नवीन अॅक्सिस बँक कार्ड मिळेपर्यंत अखंडपणे कार्यरत राहतील. मायग्रेशनच्या तारखेपर्यंत जमा केलेले पॉईंट्स कधीच संपणार नाहीत. मात्र, मायग्रेशननंतर मिळणारे पॉईंट्स तीन वर्षांनंतर संपतील, असंही त्यांनी म्हटलंय.
एचडीएफसी क्रेडिट कार्ड
एचडीएफसी बँक लिमिटेडनं क्रेड, पेटीएम, चेक, मोबिक्विक आणि फ्रीचार्ज सारख्या प्लॅटफॉर्मद्वारे क्रेडिट कार्डाच्या माध्यमातून केलेल्या रेंट पेमेंटसाठी नवीन दर लागू केले आहेत. १ ऑगस्ट २०२४ पासून हे दर लागू होणार आहेत.