Join us

'या' बँकांचे क्रेडिट कार्ड असणाऱ्यांची दिवाळीत चांदी! खरेदीवर मिळतोय १० हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 11:57 AM

Festive Shopping : सणासुदीच्या दिवसात तुम्ही जर नवीन वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असाल तर थांबा. कारण, काही बँका क्रेडिट कार्डवर बंपर सूट देत आहेत.

Festive Shopping : शॉपिंग हा भारतीयांचा आवडता छंद मानला जातो. भारतीयांना खरेदीसाठी फक्त निमित्त हवे असते. सणासुदीत तर खास खरेदी करण्याचे मुहूर्त असतात. जर तुम्ही देखील दिवाळीच्या दिवसात खरेदी करणार असाल तर क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यास मोठी बचत होऊ शकते. सध्या अनेक बँका आणि फायनान्स कंपन्या क्रेडिट कार्डवर बंपर ऑफर्स घेऊन आल्या आहेत.

एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डखाजगी क्षेत्रातील आघाडीची एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना देशांतर्गत फ्लाइट्सवर १३०० रुपयांपर्यंत १५% सूट आणि Travelxp द्वारे बुक केलेल्या सर्व आंतरराष्ट्रीय फ्लाइट्सवर ५००० रुपयांपर्यंत १५% सूट देत आहे. तुम्ही तुमच्या शहरातील लोकप्रिय रेस्टॉरंटमध्येही जेवणावर सवलत मिळवू शकतात. ही ऑफर केवळ मोठ्या शहरात उपलब्ध आहे.

एसबीआय क्रेडिट कार्डतुम्हाला या दिवाळीत आयफोन खरेदी करायचा असेल तर एसबीआयचे क्रेडिट कार्ड नक्की वापरा. SBI कार्ड वापरकर्त्यांना १०,००० रुपयांपर्यंत इन्स्टंट  डिस्काउंट देत आहे. ही ऑफर २८ डिसेंबरपर्यंत उपलब्ध आहे.

ICICI बँक क्रेडिट कार्डस्विगी आणि स्विगी इन्स्टामार्टवर ICICI बँक क्रेडिट कार्ड पेमेंटवर अनेक ऑफर उपलब्ध आहेत. स्विगी फूड डिलिव्हरीवर वापरकर्त्यांना ६४९ रुपयांच्या किमान ऑर्डर मूल्यावर ५० रुपये अतिरिक्त सूट मिळू शकते. ICICI बँक क्रेडिट कार्ड वापरकर्ते १००० रुपयांच्या किमान ऑर्डर मूल्यावर १५० रुपयांपर्यंत १०% सूट मिळवू शकतात. ऑफर ICICI बँक क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डवर लागू आहे.

दागिन्यांच्या खरेदीवर सूटICICI बँकेचे क्रेडिट आणि डेबिट कार्ड वापरकर्ते सूरत डायमंड ज्वेलरीमध्ये किमान २००० रुपयांच्या व्यवहारांवर २० टक्के झटपट सूट घेऊ शकतात. सवलत मिळविण्यासाठी, त्यांना ICICI बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेला कूपन कोड वापरावा लागेल. ही ऑफर ३१ मार्च २०२७ पर्यंत वैध आहे.

आयफोन १६ वर सवलतICICI बँक क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना आयफोन १६ ऑनलाइन खरेदी केल्यास ६००० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. ही ऑफर ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत वैध असेल.

टॅग्स :खरेदीदिवाळी 2024आयसीआयसीआय बँकएचडीएफसी