Lokmat Money > बिझनेस न्यूज > Credit Card Tax : क्रेडिट कार्डवरून खरेदीच्या नियमांत सरकारनं दिला दिलासा, तुर्तास TCS नाही

Credit Card Tax : क्रेडिट कार्डवरून खरेदीच्या नियमांत सरकारनं दिला दिलासा, तुर्तास TCS नाही

यापूर्वी १ जुलैपासून नवा टीसीएसचा नियम लागू करण्यात येणार होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 09:56 AM2023-06-29T09:56:54+5:302023-06-29T09:57:59+5:30

यापूर्वी १ जुलैपासून नवा टीसीएसचा नियम लागू करण्यात येणार होता.

Credit Card Tax The government has given relief in the rules of credit card purchases currently there is no TCS | Credit Card Tax : क्रेडिट कार्डवरून खरेदीच्या नियमांत सरकारनं दिला दिलासा, तुर्तास TCS नाही

Credit Card Tax : क्रेडिट कार्डवरून खरेदीच्या नियमांत सरकारनं दिला दिलासा, तुर्तास TCS नाही

सरकारनं सुधारित टीसीएस (TCS) दर लागू करण्याची तारीख ३ महिन्यांनी वाढवली आहे. हा नवा नियम आता १ ऑक्टोबरपासून लागू होईल. अर्थ मंत्रालयाने बुधवारी याबाबत अधिसूचना जारी केली. टीसीएसचे वाढलेले दर (TCS Rates) यावर्षी १ ऑक्टोबरपासून लागू होतील, असं या अधिसूचनेत म्हटलं आहे. जुन्या अधिसूचनेत ही तारीख १ जुलै अशी नमूद करण्यात आली होती. अशाप्रकारे सरकारनं ही दुरुस्ती लागू करण्याची तारीख ३ महिन्यांनी वाढवली आहे.

क्रेडिट कार्ड पेमेंट देखील LRS अंतर्गत आणले जातील अशी घोषणा मार्च महिन्यात करण्यात आली होती. यानंतर अनेक टिप्पण्या आणि सूचना आल्या, ज्याची अर्थ मंत्रालयानं दखल घेतली आहे. या पार्श्वभूमीवर अर्थ मंत्रालयानं काही बदल केले आहेत. इंटरनॅशनल क्रेडिट कार्डद्वारे परदेशात केलेले व्यवहार यापुढे एलआरएसच्या कक्षेत येणार नाहीत, असं सरकारनं म्हटलं आहे. याचा अर्थ या खर्चावर यापुढे टीसीएस  लागू होणार नाही. आता १ ऑक्टोबर २०२३ पासून परदेशात क्रेडिट कार्डच्या खर्चावर TCS लागणार नाही.

या खर्चांवर वाढणार दर
सरकारने वित्त कायदा २०२३ मध्ये इतर कारणांसाठी लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीममध्ये (LRS) ७ लाख रुपयांवर टीसीएस दर वाढवला होता. त्याच वेळी, वार्षिक ७ लाख रुपयांपेक्षा कमी रकमेवर एलआरएस अंतर्गत सर्व उद्देशांसाठी टीसीएसच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. नवीन टीसीएस दर लागू करण्यासाठी सरकारनं आणखी वेळ दिला आहे. वाढलेले टीसीएसचे दर १ ऑक्टोबर २०२३ पासून लागू होतील. या वर्षीच्या अर्थसंकल्पात टीसीएसच्या प्रणालीमध्ये एलआरएस आणि फॉरेन टूर प्रोग्राम पॅकेज अंतर्गत पेमेंटवर अनेक बदल जाहीर करण्यात आले होते.

Web Title: Credit Card Tax The government has given relief in the rules of credit card purchases currently there is no TCS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.