Lokmat Money > बिझनेस न्यूज > राज्यातील ३७ साखर कारखान्यांसमोर पत संकट

राज्यातील ३७ साखर कारखान्यांसमोर पत संकट

राज्य सरकारच्या निर्णयावरच या कारखान्यांना ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या गाळप हंगामामध्ये सहभागी होता येईल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 02:43 AM2020-08-18T02:43:00+5:302020-08-18T02:43:06+5:30

राज्य सरकारच्या निर्णयावरच या कारखान्यांना ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या गाळप हंगामामध्ये सहभागी होता येईल.

Credit crisis in front of 37 sugar factories in the state | राज्यातील ३७ साखर कारखान्यांसमोर पत संकट

राज्यातील ३७ साखर कारखान्यांसमोर पत संकट

विशाल शिर्के 
पिंपरी : राज्यातील तब्बल ३७ साखर कारखान्यांना अगामी ऊस गाळप हंगाम सुरू करण्यासाठी पत पुरवठा करण्यास बँकांनी असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे अगामी गाळप हंगामामध्ये त्यांना कारखाना सुरू करणे अडचणीचे ठरणार आहे. राज्य सरकारने कारखान्यांच्या कर्जाची हमी घेण्याची मागणी साखर कारखाना संघटनेने केली आहे. राज्य सरकारच्या निर्णयावरच या कारखान्यांना ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या गाळप हंगामामध्ये सहभागी होता येईल.

>मंत्री समितीच्या बैठकीकडे लक्ष
अडचणीतील कारखान्यांना पत पुरवठा मिळावा यासाठी योजना तयार करण्यात आली आहे. मंगळवारी (दि. १८) होणाºया मंत्री समितीच्या बैठकीत त्यावर निर्णय होणे अपेक्षित आहे. या प्रस्तावानुसार कारखान्यांचे पुढील पाच वर्षांचे अर्थनियोजन शक्य होणार आहे.

Web Title: Credit crisis in front of 37 sugar factories in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.