Lokmat Money > बिझनेस न्यूज > ऑनलाइन खरेदीसाठी द्यावा लागणार क्रेडिट, डेबिट कार्डचा १६ आकडी क्रमांक

ऑनलाइन खरेदीसाठी द्यावा लागणार क्रेडिट, डेबिट कार्डचा १६ आकडी क्रमांक

रिझर्व्ह बँकेचा नवा नियम; जानेवारीपासून अंमलबजावणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 06:16 AM2021-08-24T06:16:41+5:302021-08-24T06:16:55+5:30

रिझर्व्ह बँकेचा नवा नियम; जानेवारीपासून अंमलबजावणी

Credit, debit card 16 digit number required for online purchase | ऑनलाइन खरेदीसाठी द्यावा लागणार क्रेडिट, डेबिट कार्डचा १६ आकडी क्रमांक

ऑनलाइन खरेदीसाठी द्यावा लागणार क्रेडिट, डेबिट कार्डचा १६ आकडी क्रमांक

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : ॲमेझॉन, फ्लिपकार्ट किंवा नेटफ्लिक्ससारख्या कंपन्यांकडून ऑनलाइन कोणतीही वस्तू खरेदी करताना ग्राहकांना आपल्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डाचा १६ आकडी क्रमांकही यापुढे नमूद करावा लागणार आहे. त्यामुळे हा क्रमांक लक्षात ठेवण्याची कसरत प्रत्येकाला करावी लागेल. याबद्दलचे रिझर्व्ह बँकेचे नवे नियम येत्या जानेवारीपासून लागू होण्याची शक्यता आहे.

उच्च स्तरीय सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, जारी करण्यात आलेले हे नवे नियम रिझर्व्ह बँकेला जुलै महिन्यापासूनच लागू करायचे होते. मात्र, त्यासाठी बँका सज्ज नसल्याने आणखी सहा महिन्यांनी नवे नियम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
ग्राहकांची माहिती कोणीही चोरू नये व गैरवापर करू नये यासाठी, डेबिट कार्डाचा सोळा आकडी क्रमांक ग्राहकाने नमूद करण्याचा नवा नियम लागू करण्यात येणार आहे. 
काळ्या पैशावर नियंत्रन मिळविण्यासाठी केंद्र सरकार गेल्या काही वर्षापासून विविध उपाय योजना करीत आहे.
 त्याचाच भाग म्हणून रिझर्व्ह बँकेने नवे नियम जारी केले आहेत.

व्यवहारात नियमितता येणार
nक्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड यांच्या व्यवहारात नियमितता यावी यासाठीही या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. रिझर्व्ह बँक हे नवे नियम लवकरात लवकर लागू व्हावेत यासाठी आग्रही आहे.
यूपीआय प्रणालीकडे कल वाढू शकतो
nसोळा आकडी क्रमांक लक्षात ठेवून तो नमूद करण्याच्या नियमामुळे क्रेडिट वा डेबिट कार्डाद्वारे होणाऱ्या व्यवहारांना काहीसा अधिक वेळ लागू शकतो.
n त्यामुळे ग्राहकाची फारशी 
माहिती विचारत नसलेल्या यूपीआय प्रणालीद्वारे ऑनलाइन खरेदी करण्याकडे लोकांचा कल वाढू शकतो.

माहिती साठवण्यावर येणार मर्यादा 
nविविध कंपन्यांनी त्यांच्याकडे साठविलेल्या माहितीच्या आधारावर ग्राहकजगताचा वेध घेऊन कंपन्या आपले विपणन धोरण ठरवत असतात. 
nरिझर्व्ह बँकेचे नवे नियम लागू झाले की, ग्राहकांच्या कार्डासंबंधींची माहिती विशिष्ट 
कालावधीनंतर साठवून ठेवणे कंपन्यांना शक्य होणार नाही.

Web Title: Credit, debit card 16 digit number required for online purchase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.