Lokmat Money > बिझनेस न्यूज > क्रेडिट-परतावा यांची ई-नोंद

क्रेडिट-परतावा यांची ई-नोंद

करपात्र व्यक्तीने स्वत:च्या इच्छेप्रमाणे ‘परतावा क्रेडिट’च्या ठेवलेल्या नोंदवह्या आता प्रस्तावित करप्रणालीत ग्राह्य धरल्या जाणार नाहीत.

By admin | Published: January 28, 2017 12:45 AM2017-01-28T00:45:31+5:302017-01-28T00:46:53+5:30

करपात्र व्यक्तीने स्वत:च्या इच्छेप्रमाणे ‘परतावा क्रेडिट’च्या ठेवलेल्या नोंदवह्या आता प्रस्तावित करप्रणालीत ग्राह्य धरल्या जाणार नाहीत.

Credit-Refunds e-Record | क्रेडिट-परतावा यांची ई-नोंद

क्रेडिट-परतावा यांची ई-नोंद

करपात्र व्यक्तीने स्वत:च्या इच्छेप्रमाणे ‘परतावा क्रेडिट’च्या ठेवलेल्या नोंदवह्या आता प्रस्तावित करप्रणालीत ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. ‘वस्तू आणि सेवांवरील कर नेटवर्क’ (जीएसटीएन) या स्वतंत्र कंपनीने सर्वांसाठी उपलब्ध करून दिलेल्या ‘सामायिक ई-क्रेडिट नोंदवहीमध्येच ज्यांना ‘क्रेडिट परतावा’ द्यावयाचा आहे, त्यांनी नोंदी करावयाच्या आहेत. थोडक्यात एखाद्या करपात्र व्यक्तीला आपल्या खरेदीवरील कच्च्या मालावर जो कर लावला आहे/द्यावा लागला आहे, त्याचा क्रेडिट परतावा घ्यावयाचा झाल्यास जोपर्यंत तो त्याची नोंद ‘ई-क्रेडिट’ मिळवणार नाही.
एवढेच नव्हे तर त्याने ज्याच्याकडून कच्चा माल/
भांडवली वस्तू/अंतर्भूत सेवा घेतल्या असतील, तो पुरवठादार जोपर्यंत आपण पुरवठा केलेल्या मालाची/सेवेची नोंद ‘ई-पुरवठा नोंदवहीमध्ये करणार नाही, तोपर्यंत ज्याला ‘क्रेडिट परतावा’ घ्यायचा
आहे तो त्याची ‘ई-क्रेडिट’ नोंदसुद्धा करू शकणार नाही. पुरवठादाराने एकदा का नोंद केली की मग
करपात्र व्यक्ती आपल्या क्रेडिट परताव्याची नोंद करू शकतो. थोडक्यात पुरवठादाराच्या ‘ई-पुरवठा’ नोंदीवर ज्याला क्रेडिट परतावा घ्यायचा आहे,
त्याची ‘ई-क्रेडिट’ नोंद अवलंबून असल्याशिवाय पुरवठा केलेल्या वस्तू आणि / किंवा सेवेवरील कराचा भरणा करणार नाही, तोपर्यंत त्याच्याकडून वस्तू आणि / किंवा सेवा घेतलेल्या आणि क्रेडीट परतावा घेऊ इच्छिणाऱ्याला व्यक्तीला त्या वस्तू आणि / किंवा सेवेवरील कराचा क्रेडिट-परतावा तात्पुरत्या स्वरूपातच नोंदवता येईल आणि एकदा पुरवठादाराने करभरणा केला की मगच ‘क्रेडिट परतावा’ उपलब्ध झाला असे म्हणता येईल.
थोडक्यात ‘क्रेडिट परतावा’ घेताना नुसती ‘वस्तू अथवा सेवा’ आणली/मिळाली किंवा घेतली, हे पुरेसे नसून पुरवठादाराने केलेल्या ई-नोंदी व त्या अनुषंगाने केलेला करभरणाही तितकाच महत्त्वाचा आहे. यालाच ‘उपलब्ध क्रेडिट परतावा नोंद’ असे म्हणतात. असा उपलब्ध क्रेडिट परतावाच फक्त आपला देयकर भरण्यासाठी वापरता येतो. तात्पुरत्या नोंदी स्वरूपातील क्रेडिट परतावा नव्हे.
उदाहरणार्थ : ‘क्ष’ व्यक्तीने ’य’ व्यक्तीला पेनांचा पुरवठा केला तर जोपर्यंत ‘क्ष’ व्यक्ती पुरवठा केलेल्या पेनांची नोंद ‘ई-नोंद’ म्हणून करत नाही, तोपर्यंत ‘य’ व्यक्तीला पेनांवर लावलेले जीएसटी (सीजीएसटी, एसजीएसटी किंवा आयजीएसटी) आपल्या ‘ई-नोंद’ खात्यात क्रेडिट म्हणून तात्पुरत्या स्वरूपातील दाखवावे लागेल.
जेव्हा ‘क्ष’ व्यक्ती पेनांच्या पुरवठ्याची ई-नोंद करेल आणि जीएसटी भरणा केल्याची नोंद करेल, तेव्हा ‘य’ व्यक्तीला ‘तात्पुरते नोंदवलेले क्रेडिट’ पक्क्या स्वरूपात वापरता येईल. -अ‍ॅड. विद्याधर आपटे

Web Title: Credit-Refunds e-Record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.