नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली नुकताच वादात सापडला होता. मात्र, याचे कारण क्रिकेटशी संबंधित नव्हते, तर सोशल मीडिया पोस्टशी संबंधित होते. विराट कोहलीने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवरून एक पोस्ट शेअर केली होती. यासंदर्भात त्याला भारताच्या जाहिरात नियामक अॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडिया (ASCI)ने नोटीस पाठवली होती. (criceter virat kohli instagram paid post controversy ASCI guidelines for influencer advertising in india)
ASCIची नोटीस मिळाल्यानंतर कोहलीने त्याची इन्स्टा पोस्ट एडिट केली. ज्या सेलिब्रिटीजचे सोशल मेडियावर फॉलोअर्स मोठ्या प्रमाणावर आहेत, ते त्यांच्या चाहत्यांना प्रभावित करण्यासाठी पोस्ट करत असतात. याला इन्फ्लूएन्सर मार्केटिंग म्हणतात. विराट कोहलीला त्याच्या चाहत्यांपर्यंत, अशा प्रकारची पोस्ट पोहोचवण्यासाठी इन्फ्लून्सर मार्केटिंगच्या स्वरूपात एका इन्स्टा पोस्टसाठी सुमारे 5 कोटी रुपये मिळतात.
इन्स्टावर विद्यापीठाचे कौतुक
विराट कोहलीने गेल्या 27 जुलैला इन्स्टाग्रामवर एक पोस्ट टाकली. ही तीन फोटो असलेली पोस्ट टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एका विद्यापीठाच्या विद्यार्थ्याबद्दल आहे. पहिल्या फोटोमध्ये विराटने लिहिले आहे, "भारताने टोकियो ऑलिम्पिकसाठी पाठवलेल्या एकूण खेळाडूंपैकी 10 टक्के खेळाडू या विद्यापीठातील आहेत. हा एक विक्रम आहे. आशा आहे की या विद्यापीठाचे विद्यार्थीही भारतीय क्रिकेट संघाचाही भाग होतील."
विरुष्काच्या बॉडीगार्डचा रुबाब लय भारी; पगाराचा आकडा पाहून डोळेच फिरतील
ASCI ची नोटीस -
पुढील दोन फोटोंमध्ये विद्यापीठाचे पोस्टर होते. यावर संबंधित 11 खेळाडूंची नावे होती. कोहलीने या इन्स्टा पोस्टमध्ये विद्यापीठाचे नावही नमूद केले होते. प्रत्यक्षात ही एक पेड पोस्ट आहे आणि यालाच इन्फ्लुएन्सर मार्केटिंग म्हटले जाते. याचा अर्थ क्रिकेटर विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर ही पोस्ट टाकण्यासाठी विद्यापीठाकडून पैसे घेतले. यानंतर ASCI ने कोहलीला नोटीस पाठविली.
जाहिरात गाइडलाइन्स -
ASCIच्या नियमांप्रमाणे, जर एखाद्या सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सरने पेड पोस्ट केली असले तर, त्यांने आपल्या फॉलोअर्सना, संबंधित पोस्ट जाहिरात कॅम्पेनचा भाग असल्याचे सांगायला हवे. विराट कोहलीने विद्यापीठाच्या पोस्टमध्ये यासंदर्भात कुठेही उल्लेख केलेला नव्हता. यामुळे कोहलीला एएससीआयने नोटीस पाठविली होती. या नोटिशीनंतर कोहलीने इन्स्टा पोस्ट एडिट केली आणि त्याता पार्टनरशिपचा टॅग लावला.