भारताचा स्टार क्रिकेटर यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने गुंतवणुकीचा 'षटकार' ठोकला आहे. शेअर बाजार अथवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक न करता त्याने थेट कंपनीत २ टक्के हिस्साच विकत घेतला आहे. साधारणपणे 7 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या कंपनीत त्याने 7 कोटी रुपयांहून अधिकची गुंतवणूक केली आहे.
ऑनलाइन सॉफ्टवेअर मार्केटप्लेस टेकजॉकी डॉट कॉमने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, क्रिकेटर ऋषभ पंतने या कंपनीत 7.40 कोटी रुपयांत दोन टक्के हिस्सेदारी मिळवली आहे. आकाश नांगियाने अर्जुन मित्तलसग 2017 मध्ये टेकजॉकी डॉट कॉमची स्थापना केली होती. हे अॅप संपूर्ण भारतातील सॉफ्टवेअर विक्रेत्यांना छोट्या व्यवसायांसोबत जोडते. कंपनीचा व्यवसाय सातत्याने वाढत आहे.
कंपनीसंदर्भात - नांगियाने दिलेल्या माहितीनुसार, 370 कोटी रुपयांच्या (साधारणपणे 4.417 कोटी अमेरिकन डॉलर) मुल्यांकनावर नवीन भांडवल उभारण्यात आले आहे, यात पंतने या करारांतर्गत कंपनीतील दोन टक्के वाटा मिळवला आहे.
क्रिकेटच्या भाषेत समजावलं गुंतवणुकीचं गणित -ऋषभ म्हणाला, क्रिकेटमध्ये लाइव्ह स्ट्रीमिंग, कॉमेंट्री आणि डीआरएससाठी योग्य तंत्रज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्याला तत्काळ निर्णय घेण्यासाठी योग्य उपकरणांची आवश्यकता असते. याच पद्दतीने, मला जाणवले की, योग्य सॉफ्टवेअर व्यवसाय अधिक कार्यक्षमतेने वाढवण्यास किती महत्वाचे ठरू शकते. यामुळे Techjockey.com मध्ये गुंतवणूक करणे हा मला योग्य निर्णय वाटला.
काय करते कंपनी -टेकजॉकी सॉफ्टवेअर हे सोल्यूशन्स आणि बिक्री पोर्टल आहे. हे व्यवसायांना आवश्यक असलेले सॉफ्टवेअर शोधण्यास आणि ते थेट त्यांच्याच पोर्टलवरून खरेदी करण्याची सुविधा देते. यात सोशल मीडिया मार्केटिंग, जाहिरात आणि प्रीमियम सूची यांसारख्या क्षेत्रांचा समावेश आहे. आतापर्यंत या पोर्टलवर 1800 हून अधिक सॉफ्टवेअर आणि 3600 हून अधिक ग्राहक आहेत. कंपनीचा वार्षिक महसूल सुमारे 95 कोटी रुपये एवढा असून सुमारे 157 कर्मचारी कंपनीत काम करतात.