Lokmat Money > बिझनेस न्यूज > जागतिक बाजारात संकट, वाहन निर्यातीला फटका, ५.५ टक्क्यांनी घट

जागतिक बाजारात संकट, वाहन निर्यातीला फटका, ५.५ टक्क्यांनी घट

मागील वर्षात व्यावसायिक वाहने, दुचाकी तसेच तीनचाकी वाहनांच्या निर्यातीत लक्षणीय घट झाली तर प्रवासी वाहनांची निर्यात वाढली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 09:58 AM2024-04-15T09:58:40+5:302024-04-15T09:59:10+5:30

मागील वर्षात व्यावसायिक वाहने, दुचाकी तसेच तीनचाकी वाहनांच्या निर्यातीत लक्षणीय घट झाली तर प्रवासी वाहनांची निर्यात वाढली.

Crisis in global markets auto exports hit down 5 5 percent know details | जागतिक बाजारात संकट, वाहन निर्यातीला फटका, ५.५ टक्क्यांनी घट

जागतिक बाजारात संकट, वाहन निर्यातीला फटका, ५.५ टक्क्यांनी घट

२०२३-२४ या आर्थिक वर्षात वाहन निर्यातीत ५.५ टक्क्यांची घट झाल्याचे वाहन उत्पादक संघटना सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमाेबाइल मॅन्युफॅक्चरर्सने (सियाम) सांगितले. जागतिक बाजारातील संकटांमुळे निर्यात मंदावल्याचे सियामने म्हटले आहे. 
 

मागच्या आर्थिक वर्षात एकूण ४५,००,४९२ वाहनांची निर्यात करण्यात आली. तर २०२२-२३ या आर्थिक वर्षात एकूण ४७, ६१,२९९ वाहनांची निर्यात करण्यात आली. मागील वर्षात व्यावसायिक वाहने, दुचाकी तसेच तीनचाकी वाहनांच्या निर्यातीत लक्षणीय घट झाली तर प्रवासी वाहनांची निर्यात वाढली. जानेवारी-मार्च तिमाहीत यात सुधारणा झाली. 
 

प्रकार    २०२३-२४    २०२२-२३     वाढ/घट
प्रवासी वाहने    ६,७२,१०५    ६,६२,७०३     +१.४% 
दुचाकी वाहने     ३४,५८,४१६    ३६,५२,१२२     -५.५% 
व्यावसायिक     ६५,८१६    ७८,६४५      -१६% 
तीनचाकी      २,९९,९७७    ३,६५,५४९     -१८% 
 

मारुती सुझुकीने मागील वर्षात २,८०,७१२ वाहनांची निर्यात केली. २०२२-२३ मध्ये कंपनीने २,५५,४३९ वाहने निर्यात केली. ह्युंदाईने मागील आर्थिक वर्षात १,६३,१५५ वाहनांची निर्यात केली. २०२२-२३ मध्ये कंपनीने १,५३,०१९ वाहनांची निर्यात केली. किया मोटर्सने मागील वर्षात ५२,१०५ वाहनांची निर्यात केली होती.
 

जगभरातील विविध देशांच्या बाजारात सध्या अस्थिरता आहे. ज्या देशांमध्ये व्यावसायिक वाहने, तसेच दुचाकींची मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते, त्या देशांत परकीय चलनाच्या समस्या निर्माण झाल्या आहेत.
विनोद अग्रवाल,
अध्यक्ष, सियाम

Web Title: Crisis in global markets auto exports hit down 5 5 percent know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.