Join us  

क्रोमाचे 'कॉन्स्टिट्यूशन ऑफ जॉय' कॅम्पेन, प्रजासत्ताक दिनानिमित्त अनेक उत्पादनांवर शानदार डील्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 3:47 PM

Croma : १९ जानेवारी रोजी सुरु झालेला हा सेल २९ जानेवारी २०२३ पर्यंत सुरु राहील. 

नवी दिल्ली : भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ओम्नी-चॅनेल इलेक्ट्रॉनिक्स रिटेलर आणि टाटा समूहातील एक ब्रँड क्रोमाने 'रिपब्लिक डे सेल' अर्थात प्रजासत्ताक दिन सेलच्या निमित्ताने 'कॉन्स्टिट्यूशन ऑफ जॉय' कॅम्पेन सुरु केल्याची घोषणा केली आहे. १९ जानेवारी रोजी सुरु झालेला हा सेल २९ जानेवारी २०२३ पर्यंत सुरु राहील. 

भारतामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी आणि देशवासीयांच्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी राज्यघटना लिहिली गेली, ही प्रेरणा डोळ्यासमोर ठेवून क्रोमाने आपल्या 'कॉन्स्टिट्यूशन ऑफ जॉय' कॅम्पेनमध्ये इतरांच्या जीवनात बदल घडवून आणण्याचे आणि ग्राहकांना मिळणाऱ्या अनुभवात सुधारणा घडवून आणण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे. क्रोमा ब्रँडेड उत्पादने आणि ऍपल, सॅमसंग, एचपी, डेल, लेनोवो, एलजी, वोल्टास, रेडमी, ओपो यासारख्या लोकप्रिय ब्रँड्सचे लॅपटॉप्स, स्मार्टफोन, स्मार्टवॉचेस, स्मार्ट टीव्ही, साऊंडबार, हेडफोन, स्पीकर्स, टॅबलेट, ऍक्सेसरीज व इतर अनेक उत्पादनांवर अनेक आकर्षक डील्स व ऑफर्सचा लाभ घेण्याची ही उत्तम संधी आहे.    

गॅजेट्स, घरगुती उपकरणे, ऍक्सेसरीज आणि इतर अनेक उत्पादनांवर ग्राहकांना ५०% पर्यंत सूट मिळवता येईल. स्टोर्समध्ये कन्ज्युमर फायनान्सवर ५,००० रुपयांपर्यंत कॅशबॅक आणि निवडक बँक कार्डांवर १० टक्क्यांपर्यंत इन्स्टन्ट डिस्काउंट देखील उपलब्ध आहे. क्रोमाने उत्कृष्ट ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांची विशाल श्रेणी उपलब्ध करवून दिल्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या आवडीनिवडी, गरजा याठिकाणी नक्की पूर्ण होतील. आकर्षक सूट देण्याबरोबरीनेच स्टोअरमध्ये जाऊन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना जास्तीत जास्त बचत करता यावी, यासाठी कूपन कोड, स्क्रॅच अँड विन कार्ड्स अशा अनोख्या प्रमोशनल ऑफर्स देखील क्रोमाने ठेवल्या आहेत.

- क्रोमामधून स्मार्टफोन खरेदी करा व स्क्रॅच अँड विन कार्ड मिळवा व जिंका २.५ लाख + भेटवस्तू किंवा टाटा नेक्सन ईव्ही कार किंवा रिव्हॅम्प मोटो इलेक्ट्रिक बाईक्स.

- कोर आय३ (Core i3) लॅपटॉप्सच्या किमती ३३,९९०* रुपयांपासून पुढे तर इन्टेलच्या गेमिंग लॅपटॉप्सच्या किमती ५४,९९०* रुपयांपासून पुढे आहेत. विद्यार्थी व शिक्षक यांना लॅपटॉप्सवर सरसकट १०% ची सूट मिळणार आहे. सॅमसंग निओ क्यूएलईडी टीव्ही दर महिन्याला १,९९० रुपये हफ्त्याने खरेदी करू शकता, ४के एलईडी टीव्हीसाठी दर महिन्याला ९९०* रुपये आणि एलजी ओएलईडी टीव्हीसाठी दर महिन्याला २,९९९ रुपये अशा आकर्षक ऑफर्स आहेत.

- वोल्टासचा फोर-इन-वन इन्व्हर्टर स्प्लिट एअर कंडिशनर दर महिन्याला फक्त २,९९९* रुपये भरून विकत घेता येईल. क्रोमा ३०७ लिटर इन्व्हर्टर फ्रॉस्ट-फ्री रेफ्रिजरेटरची किंमत २२,९९०* रुपये आहे. ऍक्वागार्ड आरओ+यूव्ही वॉटर प्युरिफायर फक्त १४,९९०* रुपयांना आणि फ्रंट-लोड वॉशिंग मशीन फक्त १९,९९०* रुपयांपासून पुढील किमतींना उपलब्ध आहे.

- क्रोमाच्या ३०७लिटर इन्व्हर्टर फ्रॉस्ट-फ्री रेफ्रिजरेटरची किंमत २२,९९०* रुपये आहे. फिलिप्सचा ३-बर्नर ग्लास कूकटॉप २,४९०* रुपयांना आणि एअर फ्रायरच्या किमती ६,९९९* रुपयांपासून पुढे आहेत. ऍपल युजर्ससाठी एअरपॉड्सच्या किमती ८,९९९* रुपयांपासून पुढे आहेत. क्रोमा २० वॅट पार्टी स्पीकरच्या किमती ३,५९९* रुपयांपासून पुढे आहेत. काही बँकांनी ५,०००* रुपयांचे अतिरिक्त कॅशबॅक देखील देऊ केले आहे.

कॅम्पेनच्या निमित्ताने एक विशेष फिल्मदरम्यान, क्रोमाने डिजिटल कॅम्पेनच्या निमित्ताने एक विशेष फिल्म तयार केली आहे. एका क्रोमा ग्राहकाच्या आयुष्यात घडलेल्या खऱ्या घटनेवर ही फिल्म आधारित आहे. फिल्मची संकल्पना क्रोमाच्या इन-हाऊस क्रिएटिव्ह टीमने तयार केली असून निर्मिती युजफूल गार्बेज क्रिएशन्सने व दिग्दर्शन गौरव गुप्ता यांनी केले आहे. ग्राहकांना साहाय्य प्रदान करण्यासाठी आपल्या नेहमीच्या कामांबरोबरीनेच काही अतिरिक्त प्रयत्न करण्याचे क्रोमाचे ब्रँड वचन या फिल्ममध्ये अधोरेखित करण्यात आले आहे.  

या फिल्ममध्ये के आर रामकृष्णन आपल्या नातवाच्या वाढदिवसासाठी स्वयंपाक करत आहेत व त्यांचा नातू याचा लाईव्ह व्हिडिओ प्रक्षेपण करत असतो. पण चटणी तयार करत असताना त्यांचा १० वर्षे जुना मिक्सर मध्येच बिघडतो व मोठीच अडचण उभी राहते. हा व्हिडिओ क्रोमाचे एक वरिष्ठ अधिकारी पाहतात व कस्टमर सर्व्हिस टीमला संपर्क साधतात. कस्टमर सर्व्हिस टीम शोधाशोध करते व दिल्लीत मिक्सरचा एकच शेवटचा पीस असल्याचे त्यांना समजते. आणि तो दिल्लीत असलेला एकमेव शेवटचा पीस अर्थात रामकृष्णन यांना हवा असलेला मिक्सर तामिळनाडूमध्ये त्यांच्या घरी पोहोचवला जातो. 

इलेक्ट्रॉनिक उपकरण छोटे असो वा मोठे, ग्राहकांचे अनेक ऋणानुबंध त्यांच्याशी जोडले गेलेले असतात, ही बाब क्रोमासाठी खूप महत्त्वाची आहे हे या फिल्ममधून दाखवले गेले आहे. आपल्या ग्राहकांना श्रेणीतील सर्वोत्तम आणि सुरुवातीपासून अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत सर्वोत्कृष्ट खरेदी अनुभव प्रदान करण्याची क्रोमाची निष्ठा या फिल्ममध्ये दर्शवली गेली आहे.  

जबाबदारीचे पुरेपूर भान राखणारा ब्रँड म्हणून क्रोमा आपल्या ग्राहकांना आनंदी क्षण अनुभवण्याच्या संधी प्रदान करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील असतो. आता त्याही पलीकडे जाऊन विशेष प्रयत्न करून इतरांच्या जीवनात सकारात्मक व आनंदी वातावरण निर्माण करण्यासाठी हा ब्रँड पावले उचलत आहे. 

टीव्ही, लॅपटॉप्स, स्मार्टफोन्स, स्मार्टवॉचेस, साऊंडबार आणि इतर अनेक उत्पादनांवर आकर्षक डील्स!- सर्वात नवीन आणि उत्तमोत्तम इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांच्या खरेदीमध्ये भरपूर बचत करण्याची संधी.- क्रोमा स्टोर्स आणि वेबसाईटवर १९ ते २९ जानेवारी २०२३ दरम्यान या सेलचा लाभ घेता येईल.-  विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी लॅपटॉप्सवर मिळवा विशेष सूट. - साऊंडबारवर ७०% पर्यंत सूट.- स्मार्टवॉचेसच्या किमती १२९९ रुपयांपासून पुढे. -  स्टोर्समध्ये कन्झ्युमर फायनान्सवर ५०% पर्यंत कॅशबॅक आणि निवडक बँक कार्डांवर १०% पर्यंत इन्स्टंट डिस्काउंट. 

*सर्व ऑफर्सना अटी व शर्ती लागू आहेत.

टॅग्स :व्यवसाय