Lokmat Money > बिझनेस न्यूज > पीक विमा काढण्याची मुदत वाढली!

पीक विमा काढण्याची मुदत वाढली!

देशातील पाऊस व पिकांंची स्थिती बघता केंद्रीय कृषी मंत्रालयाने पीक विमा काढण्याची मुदत १५ सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. पण, या पीक विम्याचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फायदा काय

By admin | Published: September 4, 2015 10:10 PM2015-09-04T22:10:16+5:302015-09-04T22:10:16+5:30

देशातील पाऊस व पिकांंची स्थिती बघता केंद्रीय कृषी मंत्रालयाने पीक विमा काढण्याची मुदत १५ सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. पण, या पीक विम्याचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फायदा काय

Crop insurance expired! | पीक विमा काढण्याची मुदत वाढली!

पीक विमा काढण्याची मुदत वाढली!

अकोला : देशातील पाऊस व पिकांंची स्थिती बघता केंद्रीय कृषी मंत्रालयाने पीक विमा काढण्याची मुदत १५ सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. पण, या पीक विम्याचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फायदा काय, असा प्रश्न तज्ज्ञ शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांतील जवळपास ९ लाख शेतकऱ्यांनी ५० कोटींच्या वर रक्कम भरू न पीक विमा काढला आहे.
राज्यात आॅगस्ट अखेरपर्यंत १२७.८९ लाख म्हणजेच ९५ टक्के क्षेत्रावर विविध खरीप पिकांची पेरणी शेतकऱ्यांनी केली; पण सतत पावसाचा खंड पडल्याने पिकांचे नुकसान झाले.
शेतकऱ्यांना दुबार-तिबार पिकांची पेरणी करावी लागली. त्यामुळे शासनाने ७ आॅगस्टपर्यंत पीक विम्याची मुदतवाढ केली होती. तथापि, ही मुदतवाढ जाहीर करताना १ ते ७ आॅगस्टपर्यंत ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली केवळ त्याच शेतकऱ्यांना पीक विमा मुदतवाढीचा लाभ घेता येणार होता.
परिणामी ज्या शेतकऱ्यांनी या तारखेच्या अगोदर पेरणी केली; पण पीक विमा काढला नव्हता, त्यांचा हिरमोड झाला. आता आॅगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली, त्यांना या पीक विम्याचा लाभ होेईल का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान, पावसाची अनिश्चितता बघता केंद्रीय कृषी मंत्रालयाने पीक विमा काढण्याची मुदत १५ सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे; पण १ सप्टेंबरनंतर पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना या पीक विम्याचा फायदा होेणार असेल तर या राज्यात आता पेरणी करणारे शेतकरी उरले कुठे, असा प्रश्न तज्ज्ञ शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

Web Title: Crop insurance expired!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.