नवी दिल्ली : देशभरात जूनच्या तिस:या आठवडय़ार्पयत 131 लाख हेक्टर क्षेत्रवर खरिपातील पीक लागवड झाली असल्याचे केंद्रीय कृषी मंत्रलयाने स्पष्ट केले आहे. पावसाअभावी अजूनही देशाच्या बहुसंख्य भागात पीक लागवड झालेली नाही, असेही सूत्रंनी सांगितले.
देशभरात आतार्पयत 21.91 लाख हेक्टर क्षेत्रवर भाताची लावणी झाली आहे. 4.3क् लाख हेक्टरवर डाळींची तर 19.54 लाख हेक्टर क्षेत्रवर भरड धान्याची लागवड करण्यात आली आहे. तर 4.79 लाख हेक्टरवर तेलबियांची लागवड करण्यात आल्याची माहिती कृषी मंत्रलयाने दिली आहे. ऊसाच्या उत्पादनात जगात दुस:या क्रमांकावर असलेल्या भारतात आतार्पयत 43.92 लाख हेक्टरवर ऊस लागवड झाली आहे. यंदा 29.क्7 लाख हेक्टरवर कापूस पिकाची लागवड झाली आहे.
जून महिना संपत असताना पावसाची चिन्हे नसल्याने आणि पुढे पावसाने ओढ दिल्यास खरिपाच्या उत्पादनात घट होण्याची भीती तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार जुलैच्या पहिल्या आठवडय़ार्पयत पाऊस येऊ शकतो. अलीकडे पावसाचे आगमन लांबणीवर पडत चालले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
कृषी उत्पादनाचे निर्धारित लक्ष्य (खरिप व रब्बी हंगाम 2क्14-15) (दशलक्ष टन)
तांदूळ1क्6
गहूक्94
ज्वारी5.5क्
बाजरी23.क्क्
डाळी19.5क्
तेलबिया261
ऊस345