Join us

करोडो पीएफ खातेधारकांना दिवाळीपूर्वी मिळू शकतं 'हे' गिफ्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2021 8:44 AM

pf account holders : गेल्या वर्षी चांगले उत्पन्न केंद्रीय कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या केंद्रीय बोर्डाने या वर्षी मार्चमध्ये 2020-21 या आर्थिक वर्षासाठी 8.5 टक्के व्याज दराची शिफारस केली होती.

नवी दिल्ली : भविष्य निर्वाह निधीच्या (pf) करोडो खातेधारकांना दिवाळीपूर्वी गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. कर्मचारी भविष्य निधी संघटना (epfo) दिवाळीपूर्वीच 2020-21 या आर्थिक वर्षाचे व्याज देण्याची तयारी करत आहे. विशेष म्हणजे, दिवाळीपूर्वीच सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता आणि महागाई सवलत सुद्धा देणार आहे.  कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या केंद्रीय बोर्डाने व्याज दराला मंजुरी दिली आहे. आता कर्मचारी भविष्य निधी संघटनेने अर्थ मंत्रालयाकडे मंजुरी मागितली आहे आणि मंत्रालयही लवकरच मंजुरी देईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

गेल्या वर्षी चांगले उत्पन्न केंद्रीय कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या केंद्रीय बोर्डाने या वर्षी मार्चमध्ये 2020-21 या आर्थिक वर्षासाठी 8.5 टक्के व्याज दराची शिफारस केली होती. गेल्या आर्थिक वर्षात कर्मचारी भविष्य निधी संघटनेला 70,300 कोटींचे उत्पन्न झाले, ज्यामध्ये त्याच्या इक्विटी गुंतवणुकीचा एक भाग विकून 4,000 कोटी रुपयांचा समावेश आहे.

दरम्यान, कर्मचारी भविष्य निधी संघटनेने वित्त मंत्रालयाकडे मागितलेल्या मंजुरी संदर्भातील वृत्त Live Mint ने एका सरकारी सूत्राच्या हवाल्याने दिले आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, कर्मचारी भविष्य निधी संघटनेने 2020-21 या आर्थिक वर्षासाठी 8.5 टक्के व्याजदराने व्याज देण्यास वित्त मंत्रालयाकडे मंजुरी मागितली आहे. व्याजाचा निर्णय घेताना सर्व घटकांचा विचार करण्यात आला आहे. कर्मचारी भविष्य निधी संघटना  8.5 टक्के व्याज देण्यास सक्षम आहे.

आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले की, अर्थ मंत्रालयाकडून मंजुरी घेणे हा केवळ प्रोटोकॉलचा एक भाग आहे. कर्मचारी भविष्य निधी संघटना मंत्रालयाच्या मान्यतेशिवाय व्याज देऊ शकत नाही. कर्मचारी भविष्य निधी संघटनेला आशा आहे की, अर्थ मंत्रालय देखील त्यांच्या बोर्डाचा निर्णय आणि भक्कम आर्थिक स्थिती लक्षात घेऊन लवकरच मंजुरी देईल.

टॅग्स :भविष्य निर्वाह निधीकर्मचारी