सिंगापूर : आशियाच्या बाजारात गुरुवारी तेलाचे भाव साडेसहा वर्षांपूर्वीच्या नीचांकी पातळीवर आले. अमेरिकेच्या तेलाचा बाजारातील पुरवठा अतिरिक्त झाल्यामुळे तेल बॅरलमागे ४० अमेरिकन डॉलरवर आले.
वेस्ट टेक्सास इंटरमिजिएटच्या सप्टेंबरच्या डिलिव्हरीचे तेल बॅरलमागे ३२ सेंटस्ने खाली येऊन ४०.४८ अमेरिकन डॉलरवर आले. न्यूयॉर्कमध्ये मार्च २००९ मध्ये तेलाचा भाव सर्वात कमी म्हणजे ४० अमेरिकन डॉलर झाला होता. बें्रटचे कच्चे तेल (आॅक्टोबर डिलिव्हरी) बॅरलमागे २५ सेंटस्ने स्वस्त होऊन ४६.९१ अमेरिकन डॉलर झाले. बाजारात तेलाची मागणी कमी झाल्याचे दिसत असताना अमेरिकन तेलाचा पुरवठा वाढला व त्यामुळे अतिरिक्त पुरवठ्याबद्दल काळजी व्यक्त होऊ लागली, असे येथील आयजी मार्केटस्चे मार्केट स्ट्रॅटेजिस्ट बर्नार्ड आॅ यांनी सांगितले. या सगळ्याचा परिणाम कच्च्या तेलाच्या किमतीवर झाला. तेलाची सध्याची परिस्थिती ही त्याला अनुकूल नसल्यामुळे या किमती आणखी खाली येतील.
कच्चे तेल ४० डॉलरवर
आशियाच्या बाजारात गुरुवारी तेलाचे भाव साडेसहा वर्षांपूर्वीच्या नीचांकी पातळीवर आले. अमेरिकेच्या तेलाचा बाजारातील पुरवठा अतिरिक्त झाल्यामुळे तेल बॅरलमागे
By admin | Published: August 20, 2015 11:04 PM2015-08-20T23:04:23+5:302015-08-21T00:15:19+5:30