टोक्यो : तेलाच्या अतिरिक्त पुरवठ्यामुळे सोमवारी आशियाच्या बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव खाली आले. घसरत्या किमतीने त्रासलेल्या बाजारपेठेला स्थिर करण्यासाठी सौदी अरेबिया आणि व्हेनेझुएलाच्या तेल मंत्र्यांची चर्चा झाल्याच्या बातमीने या घसरणीला हातभार लावला.
डॉलर महाग झाल्यामुळेही तेल खाली आले. भर म्हणून अमेरिकेतील बेरोजगारी आणि वेतनात वाढीच्या शक्यतांमुळे अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह पुढील महिन्यात व्याजदरात वाढ करू शकेल या शक्यतांना बळ मिळाले. वेस्ट टेक्सास इंटरमिजिएटचे मार्च महिन्याच्या डिलिव्हरीचे तेल चार सेंटस्ने (०.१३ टक्के) महाग होऊन ३०.८५ अमेरिकन डॉलर झाले, तर एप्रिलच्या डिलिव्हरीचे ब्रेंटचे तेल सात सेंटस्ने (०.२१ टक्के) खाली येऊन ३३.९९ डॉलरवर आले. किमती वाढविण्यासाठी अन्य उत्पादक देशांशी चर्चा करण्यासाठी सौदी अरेबिया आणि व्हेनेझुएलाच्या तेल मंत्र्यांमध्ये रविवारी चर्चा झाल्याचे जाहीर झाले. त्यानंतर किमतीत बदल होत आहेत.
कच्चे तेल झाले स्वस्त
तेलाच्या अतिरिक्त पुरवठ्यामुळे सोमवारी आशियाच्या बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव खाली आले. घसरत्या किमतीने त्रासलेल्या बाजारपेठेला स्थिर करण्यासाठी सौदी अरेबिया आणि
By admin | Published: February 9, 2016 01:51 AM2016-02-09T01:51:03+5:302016-02-09T01:51:03+5:30