नवी दिल्ली : देशात पेट्रोल व डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असतानाच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील भाव काहीसे कोसळूनही भारतात पेट्रोल व डिझेल महाग होत चालल्याबद्दल माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.
गेले दोन महिने पेट्रोल व डिझेलचे भाव रोजच वाढत आहेत. कोलकाता व मुंबईत तर पेट्रोल-डिझेलच्या किमती सर्वाधिक आहेत. चार वर्षांपूर्वी क्रूड आॅइलचा जो भाव होता, त्यापेक्षा आज तो कमी आहे, तरीही देशात पेट्रोलजन्य पदार्थ महाग होत आहेत. त्यास चिदंबरम यांनी आक्षेप घेतला आहे.
पेट्रोल-डिझेल यांच्या किमतीवर केंद्र सरकार उत्पादन शुल्क तर
राज्य सरकार व्हॅट आकारते. राज्य सरकारने तर त्याच्यावर अधिभार लावला आहे.
त्यामुळे मूळ किमतीपेक्षा कर
अधिक अशी स्थिती आहे. त्यामुळे पेट्रोल व डिझेलवर जीएसटी लागू करावा, अशी सातत्याने मागणी होत आहे. मात्र त्यामुळे राज्य सरकारच्या महसुलावर विपरीत परिणाम होईल, असे सांगत राज्य सरकारे त्यास नकार देत आहेत.
कच्चे तेल स्वस्त तरीही इंधन महाग, चिदंबरम यांंची टीका
देशात पेट्रोल व डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असतानाच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील भाव काहीसे कोसळूनही भारतात पेट्रोल व डिझेल महाग होत चालल्याबद्दल माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 12:47 AM2018-04-21T00:47:05+5:302018-04-21T00:47:05+5:30