सिंगापूर : अमेरिकेतील पेट्रोलियमचा साठा आणखी वाढेल आणि मागणीपेक्षा बाजारात जास्त पुरवठा होण्याच्या शक्यतेने बाजारात तेलाची स्थिती आणखी खराब होऊन तेलाच्या किमती गडगडतील या भीतीने बुधवारी अमेरिकी टेक्सास क्रूडची किंमत ३० अमेरिकी डॉलर प्रति बॅरलपेक्षा खाली घसरल्या.रशिया आणि तेल उत्पादक देशांची संघटना ‘ओपेक’ यांच्यात उत्पादन घटविण्याबाबत सहमती होण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने गेल्या आठवड्यात बाजारातील हवा बदलली होती. अमेरिकी ऊर्जा मंत्रालय आपल्या तेल साठ्याची साप्ताहिक आकडेवारी बुधवारी उशिरा जाहीर करेल. तेव्हा बाजारासाठी ती एक वाईट बातमी असेल, असे तेल क्षेत्रातील व्यावसायिकांना वाटते. विश्लेषकांच्या मते अमेरिकेचा तेलसाठा आणखी वाढण्याची शक्यता आहे. मार्चच्या डिलेव्हरीसाठी अमेरिकी वेस्ट टेक्सास इंटरमिडियट १८ सेंट किंवा ०.६० टक्क्यांनी घसरून २९.७० अमेरिकी डॉलर प्रति बॅरल झाला. एप्रिलच्या डिलेव्हरीसाठी ब्रेंट क्रूड १४ सेंट किंवा ०.४३ टक्क्यांनी घसरून ३२.५८ डॉलर प्रति बॅरल झाला.
जागतिक बाजारात कच्चे तेल ३० डॉलरच्या खाली
By admin | Published: February 04, 2016 3:14 AM