Crude Oil in India Krishna Godavari Basin: भारतात तेलाचे(इंधन) नवीन साठे सापडले आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितल्यानुसार, आंध्र प्रदेशातील काकीनाडा किनाऱ्यापासून 30 किमी अंतरावरील समुद्र प्रकल्पातून पहिल्यांदाच तेल काढण्यात आले. 2016-17 रोजी हा प्रकल्प सुरू झाला होता आणि आता 7 जानेवारी रोजी पहिल्यांदा यातून तेल काढण्यात आले. ओएनजीसीने नोव्हेंबर 2021 पर्यंत या प्रकल्पातून तेल उत्पादन सुरू करण्याची योजना आखली होती. पण कोविडमुळे त्यात विलंब झाला.
दररोज 45000 बॅरल तेलाचे उत्पादन हरदीप सिंग पुरी म्हणाले की, तेथील 26 विहिरींपैकी 4 विहिरी कार्यरत आहेत. मे-जूनपर्यंत आम्ही दररोज 45,000 बॅरल तेलाचे उत्पादन सुरू करण्यावर भर देत आहोत. हे इंधन आणि नैसर्गिक गॅसेसचे साठे देशातील 7 टक्के गरज पूर्ण करतील. ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनने सोशल मीडियावर याबाबत एक पोस्टही शेअर केली आहे.
जून 2024 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित भारत जगातील तिसरा सर्वात मोठा तेल आयात करणारा देश आहे. देशांतर्गत गरजा पूर्ण करण्यासाठी भारत जागतिक बाजारपेठेतील विविध स्त्रोतांकडून आयात केलेल्या कच्च्या तेलावर अवलंबून आहे. दरम्यान, ओएनजीसीने X वर पोस्ट करत सांगितले की, कंपनीने 7 जानेवारी 2024 रोजी या प्रकल्पातून पहल्यांदाच तेलाचे उत्पादन सुरू केले आहे. यामुळे प्रकल्पाचा दुसरा टप्पा पूर्ण झाला आहे. तेल आणि वायू उत्पादनासाठी फेज-3 सुरू असून, जून 2024 मध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.