टोकियोः आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत 30 टक्के कपात नोंदवली गेली आहे. सौदी अरेबियानंरशियाबरोबर सुरू असलेल्या शीतयुद्धापायी कच्चा तेलाची किमती घटवल्याची आता चर्चा आहे. 1991नंतर कच्च्या तेलाच्या किमतीतली ही सर्वात मोठी कपात आहे. त्याशिवाय कोरोना व्हायरसच्या भीतीनंही मागणी घटत असल्यानंही तेलाच्या पूर्ततेला वेग आला आहे. तेल निर्यातदार देशांची संघटना(OPEC) आणि इतर मित्र देशांच्यामध्ये तेल उत्पादनात कपात करण्यासंबंधी कोणताही करार होऊ शकलेला नाही. 30 टक्के कच्चा तेलाच्या किमतीत घसरणआंतरराष्ट्रीय बेंचमार्क ब्रेंट क्रूड फ्यूचर 14.25 डॉलर म्हणजेच 31.5 घसरून 31.02 डॉलर प्रतिबॅरलवर आला आहे. 17 जानेवारी 1991ला पहिलं खाडी युद्ध सुरू झालं आणि 12 फेब्रुवारी 2016नंतर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी कपात नोंदवली गेली. सध्या 0114 GMT वर 35.75 डॉलर प्रति बॅरल ट्रेड सुरू आहे. अमेरिकेच्या वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट (WTI) क्रूडच्या किमती 11.28 डॉलर म्हणजेच 27.4 टक्क्यांनी घसरून 30 डॉलर प्रतिबॅरलवर आल्या आहेत. खाडीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर जानेवारी 1991नंतरची डब्ल्यूटीआयमध्ये ही सर्वात मोठी घसरण होती, 22 फेब्रुवारी 2016नंतर हा सर्वात नीचांकी स्तर आहे.
पेट्रोलचे दर नऊ महिन्यांच्या नीचांकी स्तरावर; जाणून घ्या आजचे भाव
देशात सर्वात मोठा तेल निर्यातदार देश सौदी अरेबिया आहे. तर दुसरा सर्वात मोठा तेल उत्पादक देश रशिया आहे. त्यामुळेच सौदी अरेबियानं तेलाचे दर कमी करून रशियावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. ओपेक आणि कोरोना व्हायरसच्या प्रकोपानं मागणीत घट येत असल्यानं किमतीत कपात केल्याचं सौदी अरेबियानं सांगत त्याचं समर्थन केलं आहे. तसेच रशियानंही उत्पादन घटवण्यास नकार दिला आहे. त्यानंतर लागलीच रशियावर दबाव वाढवण्यासाठी सौदी अरेबियानं तेलाच्या किमतीत कपात केली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलयुद्ध भडकल्याची स्थिती आहे. कारण सौदी अरेबिया रशियाबरोबरच्या त्याच्या ओपेकमधून बाहेर पडला असून, दबाव आणण्यासाठीच सौदी अरेबियानं आक्रमक पवित्रा घेतल्याची चर्चा आहे.