Join us

क्रूड आॅइलची किंमत लवकरच पोहोचेल १०० डॉलरच्या घरात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 11:38 PM

काल आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड आॅइलचे भाव ८०-५० डॉलर बॅरलपर्यंत वाढले. गेल्या १८ दिवसांत हे दर ५ डॉलरने वाढले आहे.

- सोपान पांढरीपांडेनागपूर : काल आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड आॅइलचे भाव ८०-५० डॉलर बॅरलपर्यंत वाढले. गेल्या १८ दिवसांत हे दर ५ डॉलरने वाढले आहे. क्रूड आॅइलमुळे पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढत आहे. पेट्रोलने ८२ रु. प्रतिलीटर तर डिझेलने ७० रु. लीटरचा टप्पा पार केला आहे. या किमती कमी करणे अशक्य आहे, असे वक्तव्य महाराष्टÑाचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. नजीकच्या काळात भाव १०० डॉलर प्रति बॅरलपर्यंत जाऊ शकतील, असे संकेत आहेत.इराणसोबतच्या अणुचाचणी करारातून अमेरिकेने एकतर्फी माघार घेतली, त्यामुळे आता इराणवर आर्थिक निर्बंध आहेत. जगातील क्रूड उत्पादनापैकी ४ टक्के उत्पादन इराण करतो. अमेरिकेच्या निर्णयामुळे इराणमधून दररोज २४ लाख बॅरल तेलाची निर्यात होणार नाही. फ्रान्सच्या टोटल पेट्रोलियमनेही इराणमधून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे.आॅर्गनायझेशन आॅफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रिज (ओपेक) व रशिया मिळून जगातील ४० टक्के क्रूड आॅइलचे उत्पादन करतात, परंतु कच्चा तेलाच्या जागतिक बाजारपेठेत मागणी-पुरवठा यात संतुलन ठेवण्यासाठी ओपेक व रशिया दीड वर्षांपासून उत्पादनात कपात करत आहेत. पेट्रोलियम उत्पादनाच्या भरवशावर असणाऱ्या व्हेनेझुएलाची अर्थव्यवस्था राजकीय अस्थिरतोमुळे संकटात आली आहे. पेट्रोलियोस डी व्हेनेझुएला या बलाढ्य कंपनीने पगार दिला नाही, म्हणून हजारो कर्मचाºयांनी नोकºया सोडल्या आहेत. त्यामुळे क्रूड उत्पादन ठप्प आहे.याचा परिपाक होऊन क्रूड आॅइलची टंचाई जगभर आहे. गेल्या वर्षी जगभर बॅरल क्रूड आॅइलचा रोजचा खप १०१ दशलक्ष होता. तो आता ९९.५० दशलक्षवर आला आहे. यामुळे आॅइलचे भाव सतत वाढत आहेत. इराक, सीरिया, लिबिया, येमेनमधील अस्थिरतेमुळे क्रूड उत्पादन आणखी कमी होण्याची शक्यता आहे.>मुंबई, हैदराबादेत सर्वात महागदिल्लीत आज पेट्रोलचे दर ७५.६१ रुपये प्रतिलीटर आहेत. मुंबईत पेट्रोल सर्वाधिक ८३.४५ रुपये लीटर झाले आहे. कोलकात्यात ७८.२९ रुपये, तर चेन्नईत ७८.४६ रुपये लीटर असा पेट्रोलचा भाव आहे. बंगळुरूमध्ये पेट्रोल ७६.८३ रुपये, तर हैदराबादेत ८०.०९ रुपये लीटर आहे. मुंबई आणि हैदराबादशिवाय इतरही अनेक शहरांत पेट्रोल ८० रुपयांच्या वर गेले आहे. यात भोपाळ (८१.१९ रुपये), जालंधर (८०.८४ रुपये), पाटणा (८१.१० रुपये) आणि श्रीनगर (८०.०५ रुपये) यांचा समावेश आहे. डिझेलचे प्रतिलीटर दर दिल्लीत ६७.०८ रुपये, कोलकात्यात ६९.६३ रुपये, मुंबईत ७१.४२ रुपये, चेन्नईत ७०.८० रुपये झाले आहेत. याशिवाय बंगळुरूमध्ये ६८.२३ रुपये आणि हैदराबादेत ७२.९१ रुपये लिटर असे डिझेलचे दर झाले.यापुढेही हीच स्थितीफ्रान्समधील इंटरनॅशनल एनर्जी असोसिएशनने बºयाच वर्षांनंतर जागतिक अर्थव्यवस्था ३.९० टक्क्याने या वर्षी वाढणार असल्याचे भाकीत केले आहे. त्यामुळे क्रूड आॅइलची मागणी वाढण्याची व त्यामुळे क्रूडचे भाव वाढण्याची शक्यता आहे. भविष्यात क्रूडचे भाव १०० डॉलर/बॅरल झाले, तर आश्चर्य वाटायला नको.