Lokmat Money > बिझनेस न्यूज > कच्च्या तेलाचे दर घसरले; नवीन वर्षात पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होणार? 

कच्च्या तेलाचे दर घसरले; नवीन वर्षात पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होणार? 

पेट्रोल, डिझेलचे दर शेवटचे कधी कमी झालेले? आता लोकसभा निवडणूक येतेय...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 08:39 AM2023-12-26T08:39:04+5:302023-12-26T08:39:49+5:30

पेट्रोल, डिझेलचे दर शेवटचे कधी कमी झालेले? आता लोकसभा निवडणूक येतेय...

Crude oil prices fall to 80 dollar; Petrol-diesel prices will decrease in the new year? | कच्च्या तेलाचे दर घसरले; नवीन वर्षात पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होणार? 

कच्च्या तेलाचे दर घसरले; नवीन वर्षात पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होणार? 

Petrol-Diesel Rate Today ( Marathi News ) भडकलेल्या पेट्रोल, डिझेलचे दर शेवटचे कधी कमी झालेले तुम्हाला आठवतेय? नाही ना, दवळपास दीड-दोन वर्षांपूर्वी इंधनाचे दर कमी झाले होते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमालीचे उतरले तरी काही केल्या केंद्र आणि राज्य सरकारांनी तिकडे ढुंकूनही पाहिले नव्हते. दिवाळी आली गेली, नवीन वर्ष आले ते ही संपले आता आणखी एका नवीन वर्षाची सुरुवात होतेय परंतु महागाईचा भडका उडविणाऱ्या इंधनाला दर कपातीचा काही तडका मिळताना दिसत नाहीय. आजही कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली आहे, आता केंद्र सरकार नववर्षानिमित्ताने नागरिकांना दिलासा देणार का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. 

येत्या दोन महिन्यांत लोकसभेच्या निवडणुकाही लागणार आहेत. यामुळे जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार पेट्रोल, डिझेलचे दर कमी करून महागाईच्या दुखण्यावर फुंकर घालण्याची शक्यता नाकारता येत नाही. पेट्रोल, डिझेलचे दर गेल्या दोन वर्षांपासून स्थिर आहेत. कच्च्या तेलाचे दर जरी उतरले तरी केंद्र सरकार याचा फायदा लोकांना काही देत नाहीय. गेल्या दीड वर्षापासून भारत रशियाकडून आंतरराष्ट्रीय किंमतीपेक्षा कितीतरी कमी किंमतीत कच्चे तेल घेत आहे. तरी देखील दिलासा दिलेला नाहीय. 

देशात थोडे थोडके नव्हे 589 दिवसांपासून इंधनाच्या किंमती स्थिर आहेत. शेवटचा बदल मे २०२२ मध्ये झाला होता. याकाळात कच्च्या तेलाचे दर 90 डॉलर प्रति बॅरलवर गेले होते. आता तर कच्चे तेल ८0 डॉलर प्रति बॅरलवर कोसळले आहे, तरी देखील किंमतीत काही बदल झालेला नाहीय. नव्या वर्षाच्या सुरुवातीला कच्चे तेल 79.07 डॉलरवर आले आहे. यामुळे पुन्हा एकदा भाबडी जनता इंधनाच्या किंमती कमी होतीय याकडे आस लावून बसली आहे. 

भारतातील इंधनाचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतात. कच्च्या तेलाच्या किंमतीत एका डॉलरने जरी वाढ झाली तरी पेट्रोल डिझेलच्या दरात ५० ते ६० पैशांची वाढ होऊ शकते. म्हणजेच जर एका डॉलरने कमी झाले तर तेवढीच घसरणही होते. परंतु, हा फायदा ऑईल कंपन्या, केंद्र सरकार काही केल्या सामान्यांना देत नाहीय. नवीन वर्षात लोकसभा निवडणूक पाहता घसरलेल्या दरांचा फायदा जनतेला मिळण्याची शक्यता आहे. 

Web Title: Crude oil prices fall to 80 dollar; Petrol-diesel prices will decrease in the new year?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.