Join us

Crypto Currency: क्रिप्टो करन्सीचा बाजार उठला! गुंतवणूकदारांचे अब्जावधी रुपयांचे नुकसान; वाढत्या महागाईचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 6:58 AM

भारतासह जगभरात महागाई नव्या उच्चांकावर पोहोचल्याने जगभरातील शेअर बाजारांमध्ये सध्या भूकंपाचे हादरे बसत आहेत.

मुंबई :

भारतासह जगभरात महागाई नव्या उच्चांकावर पोहोचल्याने जगभरातील शेअर बाजारांमध्ये सध्या भूकंपाचे हादरे बसत आहेत. क्रिप्टोकरन्सी बाजारही धारातीर्थी पडून २०२१ नंतर सर्वांत नीचांकी स्तरावर आला आहे. 

बुधवारी क्रिप्टो करन्सीचे बाजार भांडवल ८.६ टक्क्यांनी कोसळून ८६५.९४ अब्ज डॉलरच्या खाली आले आहे. या दरम्यान बिटकॉईन ७ टक्क्यांनी कोसळून २० हजार डॉलरवर, तर इथेरियमसह मोठे क्रिप्टोही जवळपास ६ ते १६ टक्क्यांपर्यंत कोसळले आहेत. क्रिप्टोकरन्सी कोसळत असल्याने जगभरातील गुंतवणूकदारांचे गेल्या काही दिवसांमध्ये अब्जावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. सोमवारी क्रिप्टो गुंतवणूकदारांचे १४ लाख कोटी रुपये बुडाले होते. भारतच नाही तर जगभरातील प्रमुख बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणात विक्रीची गती वाढली आहे. 

शेअर बाजारात सलग चौथी घरसण - जागतिक पातळीवर संमिश्र स्थिती असल्याने भारतीय बाजारामध्ये सलग चौथ्या दिवशी घसरणीचे सत्र कायम राहिले आहे. - विदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारातून सतत पैसे काढून घेत असल्याने निर्देशांक १५२ अंकांची घसरण होत ५२,५४१ वर बंद झाला. या कंपन्यांना मोठा फटकाएनटीपीसी, इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रीज, विप्रो, टेक महिंद्रा, पॉवरग्रिड

यांना मोठा फटका३.१५% निफ्टी रियल्टी४.१२% निफ्टी आयटी३.९७% निफ्टी मीडिया३.८५% निफ्टी मेटल३.१३% निफ्टी बँक

क्रिप्टो बाजार लालेलालक्रिप्टो     बुधवार       ७ दिवसांतबिटकॉईन     ९%    ३३%मेटाक्सा     ७८.४४%     ८०%पिझ्झा इन्हू     ६८%     ७५%इथेरिअम     १२%    ४०%ट्रॉन     १६%     ३६%बिटकॉईन कॅश    १०%     ३३%

१0  महिन्यांच्या नीचांकी स्तरावर सततच्या घसरणीमुळे शेअर बाजाराची पातळी पाेहोचली आहे.

गेल्या चार दिवसांमध्ये बाजार सतत कोसळत असून, यामुळे बाजार तब्बल २,७७८ अंकांनी घसरला आहे.

६ महिन्यांतील जगभरात शेअर बाजारांत खळबळदेश     इंडेक्स         घसरणअमेरिका    नॅसडॅक        ३०.४३%भारत    सेन्सेक्स        १०%जर्मनी     डीएएक्स        १३.१४फ्रान्स     सीएसी        १३%जपान     निक्केई        ९.४३%हाँगकाँग     हेंगसॅंग        ९.२३%तैवान     तैवान वेटेड        १०.०४%द. कोरिया     कॉस्पी         १८.५९%चीन     कम्पोझिट         १०.०६%ब्रिटन     एफटीएसई         १.४८% 

- अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँक व्याजदरात वाढ करण्याची शक्यता आहे. त्याचा फटका बसण्याची शक्यता म्हणून बाजार मोठ्या प्रमाणात कोसळत आहेत.- १४ लाख कोटी रुपये सोमवारी क्रिप्टो गुंतवणूकदारांचे  बुडाले होते.- १२०  डाॉलर प्रति बॅरल वर कच्च्या तेलाचे दर आले असून, यामुळे पेट्रोल महागणार आहे.

टॅग्स :क्रिप्टोकरन्सीशेअर बाजार