ग्लोबल क्रिप्टो एक्सचेंज कॉइनबेस (Coinbase) भारतातील आपली सेवा बंद करणार आहे. एक्सचेंजने आपल्या युझर्सना २५ सप्टेंबरपर्यंत त्यांच्या खात्यातील सर्व पैसे काढण्यास सांगितलं आहे. कॉईनबेसने अलीकडेच ईमेलद्वारे ही माहिती दिली. २५ सप्टेंबरनंतर, कॉइनबेसची वेबसाइट आणि ॲप्लिकेशन भारतात ॲक्सेस करता येणार नाहीत.
जर युझर्सना रोखीने व्यवहार करायचा असेल, तर ते प्लॅटफॉर्मवर उपलब्ध लिंक्ड मेथडद्वारे थेट पैसे काढू शकतात. मनी कंट्रोलनं यासंदर्भातील वृत्त दिलंय. त्यांच्याकडे क्रिप्टो असेट्स असल्यास, ते ब्लॉकचेन पत्त्याची पडताळणी करू शकतात आणि त्यांना त्यांच्याकडे असलेल्या वॉलेटमध्ये पैसे ट्रान्सफर करता येतील.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (ट्विटर) वर युझर्सनं या संदर्भात त्यांच्या चिंता व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, तुमचा पैसा आमच्याकडे सुरक्षित आहे आणि तुम्ही Coinbase Wallet सह इतर क्रिप्टो वॉलेट्स किंवा सर्व्हिसेसना फंड पाठवू शकता. मात्र यावर ट्रान्झॅक्शन फी आकारली जाईल असं Coinbase ने वापरकर्त्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये म्हटलं आहे.
काय म्हटलंय ईमेलमध्ये?
कॉइनबेस वॉलेट हे आमचे सेल्फ-कस्टडी वॉलेट आहे आणि यामुळे तुमच्याकडे तुमच्या क्रिप्टोचं संपूर्ण कंट्रोल राहतं. कॉईनबेस वॉलेट लाखो टोकन आणि डी सेंट्रलाईज्ड अॅपना सपोर्ट करतं. जे त्यांच्या अपडेटेड स्टँडर्ड्सना पूर्ण करत नाही, त्यांच्या सर्वच सेवा बंद करण्यात येणार असल्याचं मनी कंट्रोलच्या प्रश्नांना उत्तरं देताना कॉईनबेसच्या सपोर्ट एक्झिक्युटीव्हनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर सांगितलं.
'आम्ही तुम्हाला या सेवा पुन्हा कधी देऊ शकू, हे याबद्दल आमच्याकडे माहिती नाही. आमच्याकडे तुमच्या भागासाठी विशिष्ट टाइमलाइन नाही, परंतु आम्ही इतर देशांमध्ये विस्तार करण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करत आहोत. तुमच्या देशात सध्या ही सुविधा उपलब्ध नाही, पण तरीही तुम्ही कॉईनसबेस वॉलेट वापरू शकता, असं एक्झिक्युटिव्हनं म्हटलं. मात्र, कार्यकारिणीनं 'अपडेटेड स्टँडर्ड' बाबत सविस्तर माहिती दिली नाही. कॉइनबेसनं एप्रिल २०२२ मध्ये भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला होता आणि त्यानंतर त्यांना सातत्यानं अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता.